‘द इंडिया स्टोरी’मध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत झळकणार श्रेयस तळपदे, शूटिंगला सुरुवात

Shreyas Talpade New Movie: अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, श्रेयसने शूटिंगच्या मुहूर्ताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रेयससोबत या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालची देखील प्रमुख भूमिका असेल.
श्रेयसने या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘ही एक उत्तम कथा आहे, जी यापूर्वी कधीच सांगितली गेली नव्हती. लवकरच भेटूया चित्रपटगृहात.’ यासोबतच, श्रेयसने चित्रपटाची रिलीज तारीख देखील जाहीर केली. श्रेयस आणि काजल अग्रवालची भूमिका असलेला ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2025 ला रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
इंडिया स्टोरी चित्रपटाची कथा देशात झालेल्या मोठ्या व वादग्रस्त स्कॅंडलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके हे करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती एमआयजी प्रॉडक्शन आणि स्टुडिओचे सागर बी शिंदे करणार आहेत. चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे.
दरम्यान, श्रेयसच्या कामाबद्दल सांगायचे तर तो लवकरच कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपटात काम करताना पाहायला मिळेल. यात श्रेयसने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली असून, हा चित्रपट 17 जानेवारीला रिलीज होणार आहे.





