टॅापलेस फोटो शूट ते किसिंग सीन! कधी चर्चा तर, कधी ‘वाद’; ही अभिनेत्री अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असायची

Actress Kajol : दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. आज काजलचा वाढदिवस असून तिचा जन्म १९ जून १९८५ मध्ये मुंबईत झाला. तिने बॅालीवूडपासून आपल्या करिअरला सुरूवात केली. अनेक तेलूगू चित्रपटांत तिने काम केले आहे. ती अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असयाची. अनेकदा तिला मोठ्या ट्रोलिंगचा देखील सामना कारावा लागला आहे.
अभिनेत्रींच्या सौंदर्यांने अनेकांना भूरळ पाडली. तिचा एक मोठा चाहता वर्ग देखील आहे. ती अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली आहे. २००४ साली काजोलने मॅाडेलिंगपासून तिच्या करिअरला सुरूवात केली. या काळात तिने क्यों! हो गया ना’ या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिला २००९ मध्ये आलेल्या मगधीरा या ब्लॅाकबस्टर ठरलेल्या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने ‘डार्लिंग’, ‘थुप्पक्की’, ‘बिझनेस मॅन’, ‘नायक’, ‘जिल्ला’ यासांरख्या चित्रपटातून दमदार अभिनय साकारत प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. अभिनेत्री काजाल अग्रवाल हिचा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील टॅाप अभिनेत्रींच्या यादीत समावेश होतो.
२०१४ मध्ये अभिनेत्रीचे टॅापलेस फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे अभिनेत्री मोठ्या वादात सापडली होती. मात्र, तिने यावर स्पष्टीकरण देताना ते फोटो मॅार्फ केल्याचे सांगितले. थोडक्यात या ना त्या कारणामुळे कधी वादात तर कधी चर्चेत अभिनेत्री काजल अग्रवाल राहिलेले आहे.
View this post on Instagram
अभिनेता रणदीप हुडासोबत काजलने ‘दो लफझों की कहानी’ या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. मात्र, रणदीप हुडासोबच्या एका किसिंग सीनवरून तिला मोठ्या ट्रोलिंगचा सामाना करावा लागला होता. नंतरच्या काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आयकॅान स्टार अल्लू अर्जुनसोबत देखील अभिनेत्री काजल अग्रवालच्या अफेअरच्या रंगत असायच्या. थोडक्यात अभिनेत्री काजल अग्रवाल या ना त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असायची.





