Kajal Aggarwal : एक चाहता व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला अन्…; काजल अग्रवालने शेअर केला धक्कादायक अनुभव
Kajal Aggarwal : अभिनेता अजय देवगणच्या संघम या चित्रपटातून तिला बॅालिवूडमध्येही लोकप्रियता मिळाली.

Kajal Aggarwal shares a shocking experience : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २४ जुलैपासून देशभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या अगोदरही काही हिंदी चित्रपटांमध्ये काजल दिसली होती. अभिनेता अजय देवगणच्या संघम या चित्रपटातून तिला बॅालिवूडमध्येही लोकप्रियता मिळाली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजलने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एक चाहता तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला आणि त्याने थेट शर्ट काढून तिचा टॅटू दाखवू लागला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे तिला धक्का बसला. हा धक्कादायक प्रकार एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडल्याचे काजलने सांगितले.
Ghorpadi Peth : घोरपडी पेठेत गोळीबार; एक जण जखमी, मुख्य आरोपी सुजल परदेशी ताब्यात
परवानगीशिवाय व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसला अन्..
काजल या कटू अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली, “एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पहिल्या दिवसाचे काम संपल्यानंतर चित्रपटाचा एक सहाय्यक दिग्दर्शक माझ्या परवानगीशिवाय थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला. आत येताच त्याने शर्ट काढून छातीवर माझ्या नावाचा टॅटू असल्याचे दाखवले. हा प्रकार अचानक घडल्याने मी पूर्णपणे हादरले.”
ती पुढे म्हणाली, “त्याने माझ्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी टॅटू काढला होता, याचे मला कौतुक वाटले. मात्र, मी एकटी असताना परवानगीशिवाय माझ्या खासगी जागेत येणे योग्य नव्हते. त्यामुळे मी त्याला शांतपणे समज दिली.”
‘द इंडिया स्टोरी’मुळे चर्चेत
काजल अग्रवालचा ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चेतन डीके दिग्दर्शित या चित्रपटात श्रेयस तळपदे, अश्विनी भांडे, हार्दिका जोशी, मुरली शर्मा, मनीष वाधवा, अतुल तिवारी आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अन्नभेसळ, प्रदूषण, शेतीतील रसायनांचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम या गंभीर विषयांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात काजलने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. याशिवाय काजल लवकरच नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात मंदोदरीच्या भूमिकेतही झळकणार आहे.






