Maharashtra Politics : कैलास पाटीलही सोडणार ठाकरेंची साथ? ओमराजे निंबाळकरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार कैलास पाटील यांच्या पक्षांतराबाबत सूचक विधान करत अप्रत्यक्षपणे शिंदे गटात प्रवेशाची साद घातल्याने धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : धाराशिवच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. कैलास पाटील हे ठाकरेंची साथ सोडणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Politics)
शिवसेनेतील खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. त्यावेळी आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे नेतृत्व केले होते. तसेच आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता ओमराजे निंबाळकर यांनी कैलास पाटील यांच्या पक्षांतराच्या शक्यतेवर केलेल्या वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
‘तो त्यांचा अधिकार, मी सल्ला देणार नाही’
‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारले असता ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मला ऑपरेशन टायगरबाबत माहिती नाही. पक्षांतराच्या बाबतीत कैलास पाटील यांना जे योग्य वाटेल, तो निर्णय त्यांनी घ्यावा. तो त्यांचा अधिकार आहे.” (Maharashtra Politics)
कैलास पाटील हे आपले मित्र असून त्यांच्यासोबतची मैत्री आजही कायम असल्याचेही ओमराजे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या राजकीय निर्णयावर आपण सल्ला देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
त्याचवेळी, “ज्या लोकांसाठी आपण काम करतो, त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणंही गरजेचं आहे,” असे सांगत ओमराजे यांनी कैलास पाटील यांना अप्रत्यक्षपणे सत्ताधारी शिवसेनेत येण्याची साद घातल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
ओमराजेंच्या पक्षांतरानंतर समीकरणे बदलली
दरम्यान, विकासकामे आणि मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता कैलास पाटील यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या राजकीय हालचाली होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत’
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिक म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे,” असे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)
मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी संख्याबळ महत्त्वाचे असल्याचे सांगत सरनाईक यांनी सध्याच्या महायुती सरकारमध्ये भाजपकडे अधिक संख्याबळ असल्याने भाजपचा मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
भविष्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अधिक आमदार-खासदार निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा करू, असेही सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, कैलास पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






