Jyoti Waghmare: “तुमच्यासारखी घराणेशाहीतून आलेली माणसं…”; ज्योती वाघमारे यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
Jyoti Waghmare : 'शिवसेना कोणाची यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून'

Jyoti Waghmare : “शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यांच्या हयात त्यांनी या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवली. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिवसेना यापूर्वी ठाकरेंचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहील,” असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“शिवसेना कोणाची यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून म्हणतात. आपला पक्ष सांभाळता येत नाही आणि लोकांना तुम्ही शहाणपणा शिकवता?” असा सवाल वाघमारेंनी उपस्थित केला.
पुढे ज्योती वाघमारे म्हणाल्या, “लोकांनी जनमत देऊन शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे दिली आणि ती त्यांच्याकडे सुरक्षित आहे. सुप्रिया ताई तुम्ही सुद्धा लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी आहात. तुमच्या सारख्या घराणेशाहीतून आलेली लोक घराणेशाहीचे समर्थन करतात.”
‘तुमचं स्वतःच कर्तृत्व काय आहे?’
सुप्रियाताई शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची कन्या म्हणून तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. खासदार, आमदार सगळं तुम्हाला आयतं मिळालं, तुमचं स्वतःच कर्तृत्व काय आहे? पण एकनाथ शिंदेंनी स्वत:चं नेतृत्व स्वत:च्या कर्तृत्वाने उभं केलं आहे. शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आणि सर्वात महत्त्वाचं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला असल्याचे ज्योती वाघमारे म्हणाले.
“तुमच्यासारख्या घराणेशाहीतून आलेली माणसं घराणेशाहीचेच समर्थन करतात. पण याद राखा हा देश घराणेशाहीवर चालत नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवर आणि लोकशाहीवर चालतो. शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचीच हे महाराष्ट्रने मान्य केलं आहे,” असेही वाघमारे म्हणाल्या. Jyoti Waghmare
‘तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा’
सुप्रियाताई तुम्ही तुमच्या घरात काय जळतंय, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा. शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. विधानसभेच्या सभापतींनी दिला आहे. तसेच जनतेच्या न्यायालयाने देखील दिला असल्याचे वाघमारे म्हणाले.
दरम्यान, सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद केला जात असून, उबाठा गटाचे वकिल कपिल सिब्बल जोरदार व्युक्तिवाद करत आहेत. ते अनेक मुद्यांवर कोर्टाचे लक्ष वेधून घेत आहेत. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवला आहे.
याचदरम्यान शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी पलटवार केला आहे. Jyoti Waghmare
हेही वाचा:
Pune News: कोथरूडमध्ये राज्यातील पहिले ‘मॉडेल’ मुद्रांक व नोंदणी कार्यालय; पाहा काय आहेत खास सुविधा






