Maharashtra Politics : मोठी बातमी..! महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी ‘या’ पक्षाच्या अध्यक्षा राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
Maharashtra Politics : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला असून या पदासाठी इच्छुकांची चुरस वाढताना दिसत आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला असून या पदासाठी इच्छुकांची चुरस वाढताना दिसत आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढील अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या निवडणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करत असून, या निकालानंतरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः मैदानात उतरल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमातही त्यांनी उपस्थिती लावत पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. (Maharashtra Politics)
महत्त्वाचे म्हणजे, ज्योती मेटे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आपली इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे. यासोबतच, गरज भासल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
ज्योती मेटे यांची राष्ट्रवादीसोबत वाढती जवळीक आणि अध्यक्षपदाची इच्छा यामुळे आगामी काळात त्या या पदाच्या शर्यतीत आघाडीवर येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





