Junior World Cup Malaysia 2023 : भारताचे विजेतेपदाचं स्वप्न भंगलं; उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव…

क्वालालंपूर :- युवा विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीच्या महत्वाच्या लढतीत भारतीय संघाला बलाढ्य जर्मनीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
या उपांत्य सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात येत असलेले भारताचे अपयश या सामन्यातही कायम राहीले.
या लढतीत त्यांना तब्बल 12 पोनल्टी कॉर्नर मिळाले होते मात्र, त्याचे गोलमध्ये रुपांतर करणे एकदाही जमले नाही. या उलट जर्मनीने सामन्याच्या चारही सत्रांमध्ये गोल केले. भारताकडून एकमेव गोल चिरमाको सुदीपने 11 व्या मिनिटाला केला. जर्मनीकडून लिये हेसबाकने 8 व्या मिनिटाला व 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले.
💔 India go down against Germany in the FIH Hockey Men’s Junior World Cup Malaysia 2023 in the Semi Final.
We will compete for the 3rd place in the Tournament on 16th December 2023 at 3:30 PM IST.#HockeyIndia #IndiaKaGame #RisingStars #JWCMalaysia2023 pic.twitter.com/pwx9l1xLnS
— Hockey India (@TheHockeyIndia) December 14, 2023
ग्लेंडर पॉलने 41व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल फटकावला. स्पर्लिग फ्लोरियनने सामना संपण्याच्या दोन मिनिटेआधी मैदानी गोल करत संघाला 4-1 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली व अखेरपर्यंत हीच आघाडी निर्णायक ठरली व भारताचा पराभव निश्चित झाला.
आता भारताचा ब्रॉंझपदकासाठीचा सामना होइल. यापूर्वी भारताने 2001 साली होबार्ट व 2016 साली मायदेशात लखनऊ येथे झालेल्या युवा विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जर्मनीविरुद्धच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर भारतीय संघाला सातत्याने अपयश येत आहे. यंदाच्या वर्षी जर्मनीने भारताविरुद्ध खेळलेल्या सर्व पाचही सामन्यांत भारताला पराभूत केले आहे.





