FIH Men’s Hockey Pro League 2023/24 : भारतानं विश्वविजेत्या जर्मनीचा केला 3-0 ने पराभव…

FIH Men’s Hockey Pro League 2023/24 : एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये शनिवारी भारत आणि जर्मनी यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात हरमनप्रीत सिंगच्या संघाने विश्वविजेत्या संघाचा 3-0 असा पराभव करत लंडन लेगची (London Leg) विजयाने सुरुवात केली. या सामन्यात जर्मनीने चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यांना ती लय कायम राखता आली नाही.
ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत (16वे मिनिट), सुखजीत सिंग (41वे मिनिट) आणि गुरजंत सिंग (44वे मिनिट) यांनी युवा जर्मन संघाविरुद्ध गोल केले. जवळपास चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक हॉकीमध्ये पुनरागमन करणाऱ्या जर्मनीला डझनभर पेनल्टी कॉर्नर मिळाले पण ते सर्व व्यर्थ ठरले.
Victory for the boys in blue 💪🏻
India triumphs over Germany in a thrilling match! 🔥#HockeyIndia #IndiaKaGame #FIHProLeague #IndiaMensTeam
.
.
.
.@CMO_Odisha @FIH_Hockey @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @Limca_Official @CocaCola_Ind pic.twitter.com/e8GesMHI0K— Hockey India (@TheHockeyIndia) June 1, 2024
भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशने आपली भूमिका चोख बजावली आणि पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचे दोन पेनल्टी कॉर्नरसह तीन प्रयत्न अयशस्वी ठरवले. भारतीय संघ आता 8 जूनला पुन्हा जर्मनीशी भिडणार आहे. त्याआधी भारताची लढत 2 जूनला आणि त्यानंतर 9 जूनला ग्रेट ब्रिटनशी होईल.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ एफआयएच प्रो हॉकी लीगच्या गुणतालिकेत 13 सामन्यांतून 24 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर अर्जेंटिना 14 सामन्यांतून 26 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्रो लीगच्या अँटवर्प टप्प्यात भारताने अर्जेंटिनाचा दोनदा पराभव केला होता. 12 सामन्यांतून 26 गुणांसह नेदरलँड्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.





