जुई गडकरीने सांगितले सर्जरी करण्यामागचे कारण; म्हणाली “छोट्याशा अपघातामध्ये…”

Jui Gadkari | ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीस येते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी तिने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती.
जुईने तिची शस्त्रक्रिया झाली आहे असे सांगितले होते. मात्र तिला नेमकं काय झालं होतं याबाबत तिने खुलासा केला नव्हता. अखेर तिने एक व्हिडीओ शेअर करत सर्जरी करण्यामागचे कारण सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये जुईने, “हॅलो… आज बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ करत आहे. सगळे मला विचारत होते काय झालं होतं? तर जुलैमध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं. ” Jui Gadkari |
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे ऐकूसुद्धा येत नव्हतं. त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो. कारण पडदा आपोआप बरा होतो. आम्ही खूप वाट बघितली पण तो काही बरा झाला नाही. त्यामुळे मग सर्जरी करण्याचं ठरवलं आणि तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता तो त्यासाठीच होता. यासाठी आम्ही मालिकेचे कथानक वैगेर सर्वाचे आभार व्यक्त करत या सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं मी पाच दिवसांसाठी सुट्टीवर गेले.” Jui Gadkari |
दरम्यान जुईने, “पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंगला आलेली आहे आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप धीर दिला. कारण तेव्हा माझ्या सहकलाकारांना देखील बरं वाटत नव्हतं. पण आम्ही आमच्या एपिसोड्सची बँक बनवली होती. सर्जरीच्या दरम्यान चॅनलनेसुद्धा मला खूप पाठिंबा दिला आणि सांभाळून घेतलं. मात्र आता पुढचे काही दिवस काळजी घ्यायची आहे.”
हेही वाचा:
करीना कपूरच्या भावाने गर्लफ्रेंड आलेखा आडवाणीला केले खास स्टाईलने प्रपोज





