करीना कपूरच्या भावाने गर्लफ्रेंड आलेखा आडवाणीला केले खास स्टाईलने प्रपोज

Aadar Jain And Alekha Advani | अभिनेता आदर जैन अनेक दिवसांपासून आलेखा अडवाणीला डेट करत आहे. नुकतेच त्याने लग्नासाठी आलेखाला प्रपोज केले आहे. ज्याचे काही सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रणबीर कपूर आणि करीना कपूरचा चुलत भाऊ आणि अभिनेता आदर जैन याने रविवारी रात्री उशिरा गर्लफ्रेंड आलेख्या अडवाणीसोबत त्याच्या एंगेजमेंटची घोषणा केली.
समुद्राच्या किनाऱ्यावर लाल गुलाबांनी बनवलेल्या हृदयात गुडघ्यावर बसून अभिनेत्याने फिल्मीस्टाइलने गर्लफ्रेंडला प्रपोज करत लग्नासाठी मागणी घातली आहे. या खास क्षणी हे जोडपे भावूकही झाले. सध्या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Aadar Jain And Alekha Advani |
“माझी पहिली क्रश, बेस्ट फ्रेंड, माझं वर्तमान आणि भविष्य” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर करीना कपूरने त्यांना शुभेच्छा देत मजेशीर कमेंट केली आहे. “मेहेंदी लगाकर रखना, डोली सजाकर रखना” अशी कमेंट करीनाने केली आहे. जवळपास ३ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. पण, त्यानंतर काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप झाले.
View this post on Instagram
तारा सुतारियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आदर जैन आलेखासोबत करीना कपूर आणि सैफच्या पार्टीत पोहोचला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर आदरने आलेखासोबतच्या नात्याची पुष्टी केली. विशेष म्हणजे तारा सुतारीयाची आलेखा ही मैत्रीण आहे. तारा सुतारीया आणि आदर जैन रिलेशनशिपमध्ये असताना ती अनेकदा त्यांच्याबरोबर फिरायलाही जायची. दरम्यान, आलेखाने न्यूयॉर्कमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्वेलरी आणि कपड्याच्या ब्रँडसाठी ती मॉडेलिंग म्हणून काम करते.
हेही वाचा:
हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामा करण्याची मागणी





