Jos Buttler Record : जोस बटलरची श्रीलंकेविरुद्ध वादळी खेळी! ४४ चेंडूंत ८० धावांची बरसात करत मोडला रोहित शर्माचा विक्रम
Jos Buttler Record : जोस बटलरने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडला आहे. तो कोणता आहे? जाणून घ्या

Jos Buttler Breaks Rohit Sharma Most T20I Runs Record Harry Brook Century against Sri Lanka : कर्णधार हॅरी ब्रूकचे झंझावाती नाबाद शतक आणि जोस बटलरच्या ८० धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ११९ धावांनी धुव्वा उडवला. साउथहॅम्पटनच्या रोज बाऊल मैदानावर झालेल्या या सामन्यात हॅरी ब्रूकच्या शतकापेक्षाही जोस बटलरची आक्रमक खेळी क्रिकेटविश्वात अधिक चर्चेत राहिली. या तुफानी खेळीच्या जोरावर बटलरने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला.
४४ चेंडूंत ८० धावांची आतषबाजी; रोहित शर्माला टाकले मागे!
जोस बटलरने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करताना अवघ्या ४४ चेंडूंत ८ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ८० धावांची डोळेदीपक खेळी साकारली. या खेळीसह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बटलरच्या नावावर १४८ डावांत ४२९२ धावा जमा झाल्या आहेत. त्याने भारताच्या रोहित शर्माला (१५१ डावांत ४२३१ धावा) मागे टाकत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक यादीत मोठी झेप घेतली आहे. आता बटलरची नजर अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमच्या (१३६ डावांत ४५९६ धावा) वर्ल्ड रेकॉर्डवर लागली आहे.
ब्रूक-बटलरची १२८ धावांची भागीदारी अन् इंग्लंडचा २५४ धावांचा डोंगर!
Jos Buttler overtakes Rohit Sharma to become second-highest run-scorer in men’s T20Is
updates at https://t.co/2JIOca7tev 🌐
Jos Buttler T20I runs · Babar Azam record · Rohit Sharma T20I · England cricket stats#JosButtler #CricketNews #TeamEngland #T20IRecords #LiveScoreDesk pic.twitter.com/DtQzNyIE42
— Kartik Sharma (@Livescoredesk) September 16, 2026
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर एन्यूरिन डोनाल्ड (१२ धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ६० चेंडूंत १२८ धावांची विक्रमी भागीदारी रचली. १३ व्या षटकात वानिंदु हसरंगाने बटलरला बाद केले; मात्र त्यानंतर ब्रूकने सूत्रे हाती घेत अवघ्या ४९ चेंडूंत नाबाद ११४ धावा कुटल्या. ज्यामुळे इंग्लंडने २० षटकांत ४ बाद २५४ धावांचा विशाल डोंगर उभारला.
२५५ धावांच्या आव्हानापुढे श्रीलंका निष्प्रभ; अवघ्या १३५ धावांत गारद –
With his entertaining knock against Sri Lanka in the first T20I, Jos Buttler has overtaken Rohit Sharma to become the second highest run-scorer in T20I cricket
Take a look at the Top 5 players with the most runs in T20I cricket 👀#JosButtler #BabarAzam #RohitSharma #ENGvSL pic.twitter.com/QUzdE6RZPB
— CricTracker (@Cricketracker) September 16, 2026
प्रत्युत्तरात २५५ धावांच्या अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव सुरुवातीपासूनच पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. इंग्लिश गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाहुण्या संघाची एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. संपूर्ण श्रीलंकन संघ १९ व्या षटकात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लंडने पहिला टी-२० सामना एकतर्फी जिंकून मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेतली.





