IND vs ENG : जो रुटने रचला इतिहास! रिकी पॉन्टिंगला मागे टाकत केला खास पराक्रम

जो रूटने रिकी पॉन्टिंगच्या १३,३७८ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. रूटने हा पराक्रम १०१व्या षटकात केला. पॉन्टिंगने १९९५ ते २०१२ या काळात ऑस्ट्रेलियासाठी १६८ कसोटी सामने खेळले आणि एकूण १३,३७८ धावा केल्या होत्या, तर रूटच्या नावावर आता इंग्लंडसाठी १५७ सामन्यांत १३,३७९ धावा आहेत. पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी रूटला मँचेस्टर कसोटीत १२० धावांची गरज होती, ज्या त्याने सहज पूर्ण केल्या.
With many stalwarts now behind him, only Sachin Tendulkar remains in Joe Root’s path 👏
#WTC27 | #ENGvIND | ➡️ https://t.co/ZxLl2veHTh pic.twitter.com/FndKFXXdEv— ICC (@ICC) July 25, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
- सचिन तेंडुलकर (भारत) १५,९२१
- जो रूट (इंग्लंड) १३,३७९*
- रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) १३,३७८
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) १३,२८९
- राहुल द्रविड (भारत) १३,२८८
- अॅलिस्टर कुक (इंग्लंड) १२,४७२
- कुमार संगकारा (श्रीलंका) १२,४००
- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) ११,९५३
- शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) ११,८६७
- महेला जयवर्धने (श्रीलंका) ११,८१४
हेही वाचा – Joe Root : जो रुटचे ऐतिहासिक शतक! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू
यापूर्वी रूट-कॅलिसला टाकलं मागे –
यापूर्वी जो रूटने राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस यांचा विक्रम मोडला होता. त्यांना मागे टाकत तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला होता आणि आता १२० धावा करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. आता रूटपेक्षा जास्त कसोटी धावा फक्त सचिन तेंडुलकरने केल्या आहेत. तेंडुलकरने १९८९ ते २०१३ या काळात भारतासाठी २०० कसोटी सामने खेळले आणि ५१ शतके व ६८ अर्धशतकांच्या मदतीने १५,९२१ धावा केल्या.
हेही वाचा – IND vs ENG : अंशुल कंबोजच्या ‘त्या’ चुकीमुळे जडेजाची सटकली, पहिल्याच सामन्यात सुनावलं, पाहा VIDEO
कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासोबतच जो रूटने या सामन्यात अनेक विक्रम मोडले. मँचेस्टरमध्ये रूटचे शतक हे भारताविरुद्धचे त्याचे १२वे आणि इंग्लंडसाठी एकूण ३८वे कसोटी शतक आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट आता अव्वल स्थानावर आहे. याबाबतीत त्याने स्टीव्ह स्मिथला (११ शतकं) मागे टाकले.





