IND vs ENG : अंशुल कंबोजच्या ‘त्या’ चुकीमुळे जडेजाची सटकली, पहिल्याच सामन्यात सुनावलं, पाहा VIDEO

अंशुल कंबोजने नेमकी काय चूक केली?
मोहम्मद सिराजच्या षटकात जो रूटने चेंडू रवींद्र जडेजाच्या दिशेने मारला आणि धाव घेण्यासाठी धावला. रवींद्र जडेजाने लगेच चेंडू उचलून नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. पण चेंडू विकेटवर लागला नाही. यावेळी मिड-ऑनवर असलेला अंशुल कंबोज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला चेंडू पकडण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे जो रूटला धावबाद करण्याची संधी भारतीय संघाने गमावली. जो रूट क्रीझपासून बराच मागे होता आणि तो सहज धावबाद होऊ शकला असता.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) July 25, 2025
जो रूट आणि ऑली पोपने साकारली महत्त्वपूर्ण भागीदारी –
ही संधी हुकल्याने जडेजा चिडला आणि त्याने कंबोजला काहीतरी सुनावले. कंबोजचा हा पहिलाच कसोटी सामना आहे, आणि त्याच्याकडून पहिल्याच सामन्यात अशी मोठी चूक झाली. जो रूट आणि ऑली पोप यांनी भारतीय संघाला फारशा संधी दिल्या नाहीत. वृत्त लिहेपर्यंत इंग्लंडने ८८ षटकानंतर चार बाद ३६३ धावा केल्या आहेत. जो रुट ८४ आणि कर्णधार बेन स्टोक्स ८४ धावांवर खेळत आहे.
जो रूटने अर्धशतकासह एक मोठा विक्रमही नोंदवला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविड़ (१३,२८८ धावा) आणि जॅक कॅलिस (१३,२८९ धावा) यांना मागे टाकले. आता फक्त रिकी पॉन्टिंग (१३,३७८ धावा) आणि सचिन तेंडुलकर (१५,९२१ धावा) हे दोन खेळाडू त्याच्यापुढे आहेत.





