IND vs ENG : जो रुटचं क्रिकेटच्या पंढरीत विक्रमी शतक! अनेक दिग्गजांना टाकलं मागं

IND vs ENG Joe Root Test Century : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या खेळली जाणाऱ्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात जो रूटने शतकी खेळी करत इतिहास रचला आहे. तो सध्याच्या सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले 37 वे शतक पूर्ण केले. यासह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. ज्यामध्ये द्रविड-स्मिथ सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत जो रूटने आपले शतक पूर्ण केले. यासह तो कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये सामील झाला आहे. त्याने 199 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी साकारली. यासह त्याने राहुल द्रविड आणि स्टीव्ह स्मिथ यांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटपेक्षा जास्त शतके झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकारा यांच्या नावावर आहे.
𝐌𝐫. 𝐂𝐨𝐧𝐬𝐢𝐬𝐭𝐞𝐧𝐭 𝐢𝐧 𝐓𝐞𝐬𝐭𝐬 – 𝐉𝐨𝐞 𝐑𝐨𝐨𝐭! 👏
What a way to start Day 2 – brings up his century with a boundary off the very first ball! 💯🔥
For the 8th time, his name will be etched on the Honours Board at the Home of Cricket! 🏴🏟️#ENGvIND #Tests #JoeRoot… pic.twitter.com/koRrGeeZes
— Sportskeeda (@Sportskeeda) July 11, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंची यादी :
- सचिन तेंडुलकर – 51 शतके
- जॅक कॅलिस – 45 शतके
- रिकी पॉन्टिंग – 41 शतके
- कुमार संगकारा – 38 शतके
- जो रूट – 37 शतके
- स्टीव्ह स्मिथ – 36 शतके
- राहुल द्रविड – 36 शतके
याशिवाय, जो रूटने भारताविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंमध्येही आपले नाव नोंदवले आहे. त्याने भारताविरुद्ध 11वे शतक ठोकून स्टीव्ह स्मिथशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, स्टीव्ह स्मिथने 24 सामन्यांत 11 शतके केली, तर जो रूटला ही कामगिरी करण्यासाठी 33 सामने लागले. याशिवाय, गॅरी सोबर्स यांनी भारताविरुद्ध 8 शतके ठोकली आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकवणारे खेळाडू:
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 11 शतके
- जो रूट (इंग्लंड) 11 शतके
- गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) 8 शतके
- व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज) 8 शतके
- रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) 8 शतके
हेही वाचा – Shubman Gill : सारा तेंडुलकरच्या आईसमोर जडेजाने घेतली गिलची फिरकी; VIDEO होतोय व्हायरल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी खालीलप्रमाणे आहे
- सचिन तेंडुलकर – 100 शतके
- विराट कोहली – 82 शतके
- रिकी पॉन्टिंग – 71 शतके
- कुमार संगकारा – 63 शतके
- जॅक कॅलिस – 62 शतके
- जो रूट – 55 शतके
- हाशिम आमला – 55 शतके
- महेला जयवर्धने – 54 शतके





