Shubman Gill : सारा तेंडुलकरच्या आईसमोर जडेजाने घेतली गिलची फिरकी; VIDEO होतोय व्हायरल

Shubman Gill Teased by Ravindra Jadeja : सध्या इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणारा शुबमन गिल त्याच्या शानदार खेळाबरोबरच आणखी एका कारणाने चर्चेत आहे. युवराज सिंगच्या एका कार्यक्रमात संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ उपस्थित होता. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासह हजर होता. यावेळा शुबमन आणि सारा एकाच ठिकाणी दिसल्याचे फोटो आणि व्हिडीओ लोकांनी प्रचंड व्हायरल केले होते. आता एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जडेजा गिलला चिडवतानाचा व्हिडीओ व्हायरल –
आता हा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा शुबमन गिलला चिडवताना दिसतोय. हा व्हिडिओ युवराजच्या त्या कार्यक्रमातील आहे, जिथे शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा एकत्र बसलेले दिसतात. यावेळी टाळ्यांचा आवाज होतो आणि कॅमेरा अंजली तेंडुलकर यांच्यावर केंद्रित होतो. त्यानंतर जडेजा शुबमनला चिडवायला सुरुवात करतो. हे पाहून केएल राहुलह खूप हसू लागतो आणि ऋषभ पंत तर हसत हसत जडेजाच्या पाठीवर हात मारतो. हा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
गिल-साराचा व्हिडिओ झाला होता व्हायरल –
Jaddu 🤣 pic.twitter.com/ua6fSI8bIA
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) July 11, 2025
युवराज सिंगच्या या कार्यक्रमातील शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शुबमन गिल स्टेजवर प्रवेश करताना साराकडे पाहून हसताना दिसत होता आणि साराही त्याच्याकडे पाहताना दिसली होती. आणखी एका व्हिडिओत सारा तेंडुलकर शुबमन गिलसह टीम इंडियाचा व्हिडिओ काढताना दिसली. सोशल मीडियावर सारा आणि शुबमन अजूनही रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.
सध्या शुबमन गिलचे लक्ष लॉर्ड्स कसोटीवर आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ २-१ ने आघाडी घेऊ शकतो. शुबमन गिल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. कर्णधार म्हणून पहिल्या दोन सामन्यांतच त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीमध्ये त्याने दोन शतके आणि एक द्विशतक ठोकले आहे. कसोटी मालिकेतही तो असाच दमदार खेळ कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे.





