IND vs ENG : ‘मित्रांनो, पुन्हा सुरु झालं बोरिंग टेस्ट क्रिकेट…’, गिलने उडवली इंग्लंडच्या बॅझबॉलची खिल्ली, VIDEO व्हायरल

IND vs ENG Shubman Gill Mocks England’s Slow Batting : भारत आणि इंग्लंड संघांत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीलाच सलामीवीर बाद झाल्याने हा निर्णय त्यांच्या अंगलटी आल्याचे दिसले. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल न खेळता संथ खेळण्यास प्राधान्य दिले. ज्यामुळे शुबमन गिलने त्यांच्या बॅझबॉल शैलीची खिल्ली उडवली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्यूलम इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून इंग्लंडच्या फलंदाजी शैलीत मोठा बदल दिसून आला आहे. त्यांनी वेगवान आणि आक्रमक फलंदाजी करत जलद धावा करण्याची शैली आत्मसात केली आहे, ज्या बॅझबॉल म्हटले जाते. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंडने बॅझबॉल शैलीत खेळत जलद धावा केल्या. पण तिसऱ्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी संथ फलंदाजी करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे कर्णधार गिलने त्यांच्या संथ खेळण्यावरुन खिल्ली उडवली आहे.
गिलने इंग्लंडच्या फलंदाजांची उडवली खिल्ली –
#ShubmanGill, with the most sarcastic sledge of the season kyunki ye seekhne nahi, sikhane aaye hain 😎
“Welcome to Boring Test Cricket.” 🫢💭
Who said Test matches aren’t spicy? 🔥#ENGvIND 👉 3rd TEST, DAY 1 | LIVE NOW on JioHotstar ➡ https://t.co/H1YUOckUwK pic.twitter.com/U7fEy4HXpR
— Star Sports (@StarSportsIndia) July 10, 2025
भारतीय वेगवान गोलंदाजांचा सामना करताना इंग्लंडचे फलंदाज सावधपणे फलंदाजी करताना दिसले. भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यामुळे जो रुट आणि ऑली पोप संथ आणि सावधपणे खेळत असताना डिवचले. तो म्हणाला, “मित्रांनो, पुन्हा सुरू झालं ते कंटाळवाणं कसोटी क्रिकेट…”, गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ‘आता खेळना बॅझबॉल, मला बघायचयं…’, सिराजने रुटला दिलं ओपन चॅलेंज, VIDEO व्हायरल
इंग्लिश फलंदाजांनी संथ खेळण्यास दिले प्राधान्य –
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे इंग्लिश फलंदाज या सामन्यात सावधपणे खेळत आहेत. पहिल्या चार फलंदाजांपैकी तिघांनी ५० पेक्षा कमी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे, तर चौथ्या फलंदाजाचा स्ट्राइक रेटही ६० पेक्षा कमी आहे. दुसरीकडे, बुमराहने १३ षटकांत केवळ २१ धावा दिल्या आहेत, तर सिराजने ११ षटकांत फक्त २५ धावा दिल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांनीही फलंदाजांना संथ खेळण्यास भाग पाडले आहे.
हेही वाचा – IND vs ENG : जो रुटने भारताविरुद्ध रचला इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
रुट-स्टोक्सच्या नाबाद भागीदारीने इंग्लंड मजबूत स्थितीत
सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडने ८२ षटकानंतर ४ बाद २४८ धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड संघ मजबूत स्थितीत असून भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करत आहेत. जो रुट १८७ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ९६ धावांची खेळी साकारली आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्स १०० चेंडूचा सामना करुन ३९ धावांवर खेळत आहे. या दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी ७८ धावांची नाबाद खेळी साकारली आहे.





