J&K Assembl Elections : …त्यामुळेच मतदारांना सामोरे जाण्याची भाजपला वाटतेय धास्ती – ओमर अब्दुल्ला
Updated On:

जम्मू :– वेगवेगळी कारणे देऊन जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकली जात आहे. खरेतर, जनतेच्या समस्या सोडवण्यात भाजपला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे त्या पक्षाला मतदारांना सामोरे जाण्याची धास्ती वाटत आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचे आणि रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे भिन्न कारणे पुढे करून निवडणुकीपासून पळ काढला जात आहे, असे अब्दुल्ला जाहीर सभेत बोलताना म्हणाले.
Bihar Politics : राजकीय अफवांवर तेजस्वी यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले “ना नितीशकुमार यांना; ना मला….”
जम्मू-काश्मीरमधील निवडणूक बराच काळपासून प्रलंबित आहे. ती निवडणूक लवकरात लवकर घेण्याची मागणी भाजपेतर पक्षांकडून केली जात आहे.





