डेटा आणि मनोरंजनाचा धमाका! जिओ-एअरटेलचे 90 दिवसांच्या मुदतीसह येणारे स्वस्त प्लॅन्स; किंमत 200 रुपयांपेक्षा कमी

Best Recharge Plans | जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांकडे ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड, पोस्टपेड आणि डेटा प्लॅन्स उपलब्ध आहे. कंपन्यांकडे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 90 दिवसांच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार प्लॅन्स आहेत. या डेटा प्लॅन्समध्ये ओटीटी सबस्क्रिप्शनचा देखील फायदा मिळतो. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या जिओ, एअरटेलच्या अशाच स्वस्त डेटा प्लॅन्सविषयी जाणून घेऊयात.
जिओचा 195 रुपयांचा डेटा पॅक:
195 रुपये किमतीचा हा डेटा पॅक पूर्ण 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा एक डेटा व्हाउचर असल्यामुळे यामध्ये कोणतीही कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा उपलब्ध नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 15 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांसाठी JioHotstar (mobile/TV) चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.
जिओचा 100 रुपयांचा डेटा पॅक:
जिओचा हा डेटा पॅक देखील पूर्ण 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 5 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्येही ग्राहकांना 90 दिवसांसाठी JioHotstar (mobile/TV) चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.
एअरटेलचा 195 रुपयांचा डेटा पॅक:
195 रुपये किंमतीचा एअरटेलचा हा डेटा पॅक देखील पूर्ण 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. डेटा व्हाउचर असल्यामुळे, यामध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचे कोणतेही फायदे मिळत नाहीत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 15 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे, या प्लॅनच्या ग्राहकांनाही 3 महिन्यांसाठी JioHotstar (mobile) चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.





