एकच नंबर! एकदाच करा 365 दिवसांचे रिचार्ज, वर्षभरासाठी JioHotstar फ्री; पाहा प्लॅन्सची किंमत

JioHotstar Free Subscription | सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 स्पर्धेचा स्मार्टफोनवर आनंद घ्यायचा असल्यास तुमच्याकडे जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला महिन्याला शेकडो रुपये खर्च करावे लागू शकतात. मात्र, काही रिचार्ज प्लॅन्स असे आहेत, ज्यासोबत तुम्हाला जिओहॉटस्टार अॅपचे सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत मिळेल. 1 वर्ष मोफत सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या अशाच काही रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
एअरटेल-व्हीआयच्या प्लॅनवर मिळेल जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन
एअरटेलच्या 3,999 रुपये आणि व्होडाफोन आयडियाच्या (Vi) 3,699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सवर तुम्हाला जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅन्ससोबत तुम्ही संपूर्ण 1 वर्ष JioHotstar (Mobile) चा मोफत आनंद घेऊ शकता.
या दोन्री रिचार्ज प्लॅनची मुदत 365 दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळते.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटाचा फायदा मिळतो. तर व्हीआयच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा मिळतो. तर व्हीआयच्या ग्राहकांना केवळ मुंबईमध्ये 5जी डेटाचा फायदा मिळेल.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये स्पॅम कॉल, एसएमएस अलर्ट, एक्स्ट्रीम अॅपचे अॅक्सेस, अपोलो 24/7 सर्कल आणि फ्री हॅलोट्यूनचा फायदा मिळतो. व्हीआयच्या प्लॅनमध्ये हाफ-डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हरचा फायदा मिळेल.





