एअरटेलने लाँच केला धमाकेदार प्लॅन, एकाच रिचार्जमध्ये घ्या डेटासह 250 टीव्ही चॅनेल्सचा आनंद; किंमत फक्त…

Airtel New Recharge Plans | एअरटेलने ग्राहकांसाठी एका नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीने अवघ्या 448 रुपयांच्या किंमतीमध्ये येणारा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या एकाच रिचार्जवर मोबाइल आणि डीटीएच दोन्हींचे फायदे मिळणार आहे.
448 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक अनेक फायदे मिळतील. हा प्लॅन सध्या ठराविक राज्यातील ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीकडून भविष्यात देशभरात हा रिचार्ज प्लॅन उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. एअरटेलच्या या नवीन प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एअरटेलचा 448 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या नवीन 448 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2.5 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.
म्हणजेच ग्राहकांना संपूर्ण कालावधीसाठी एकूण 70 जीबी डेटा मिळतो. दररोजचा डेटा संपल्यानंतर ग्राहक 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतील. याशिवाय, ठराविक ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा मिळेल.
मोफत पाहता येईल 250+ चॅनेल्स
या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त बेनिफिट्स मिळतील. यामध्ये एअरटेल डिजिटल टीव्ही सबस्क्रिप्शनचा फायदा मिळतो. या अंतर्गत यूजर्स 28 दिवसांसाठी 250 हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत पाहू शकतात. याशिवाय, एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपचे सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल सदस्यता आणि मोफत हेलोट्यून्सचा फायदा मिळतो.





