Jayden Seales : जेडेन सील्सने रचला इतिहास, पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Jayden Seales create history against Pakistan : वेस्टइंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने ऐतिहासिक कामगिरी केली. तरुबाच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सील्सने 7.2 षटकांत केवळ 18 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. यासह तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स घेणारा वेस्टइंडीजचा पहिला गोलंदाज ठरला.
सील्सने या सामन्यात सलामीवीर सॅम अयूबला (0), अब्दुल्ला शफीकला (0) आणि मोहम्मद रिझवानला (0) स्वस्तात बाद करत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुवातीच धक्के दिले. यानंतर कर्णधार बाबर आझमला (9 धावा), नसीम शाहला (कॅच अँड बोल्ड) आणि हसन अलीला (0) बाद करत त्याने आपले सहा बळी पूर्ण केले. या कामगिरीमुळे त्याने वेस्टइंडीजच्या फ्रँकलिन रोज यांचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम (10 षटकांत 23 धावांत 5 विकेट्स) मोडला.
REMEMBER THE NAME, JAYDEN SEALES…!!!! 🫡
– 18 wickets from 8 games in ODIs in 2025
– 88 wickets from 21 Tests.The Pace Sensation from West Indies, Just 23 years old, really excited to see him in India for 2 Tests in October. pic.twitter.com/32VUF4wfQj
— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2025
जेडेन सील्सची ही कामगिरी वेस्टइंडीजच्या एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. यापूर्वी विंस्टन डेव्हिस (1983, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7/51) आणि कॉलिन क्रॉफ्ट (1981, इंग्लंडविरुद्ध 6/15) यांनी अव्वल कामगिरी केली आहे. सील्सच्या या ऐतिहासिक कामगिरीने वेस्टइंडीज क्रिकेटच्या नव्या पिढीतील प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे वेस्टइंडीजने हा सामना जिंकत मालिकेत आपला दबदबा दाखवला.
हेही वाचा – ICC Rankings : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फेरबदल; रोहित-तिलकची भरारी तर बाबर-हेडची घसरण
वेस्टइंडीजसाठी पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी:
- जेडेन सील्स: 7.2-0-18-6 (तरुबा, 2025)
- फ्रँकलिन रोज: 10-1-23-5 (किंग्सटाउन, 2000)
- इयान बिशप: 8.4-0-25-5 (ब्रिस्बेन, 1993)
- इयान बिशप: 10-1-27-5 (पर्थ, 1989)
- जिमी अॅडम्स: 10-0-37-5 (अॅडलेड, 1996)
पाकिस्तानविरुद्ध वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी:
- जेडेन सील्स (वेस्टइंडीज): 7.2 षटके, 0 मेडन, 18 धावा, 6 विकेट, तरुबा, 12 ऑगस्ट 2025
- डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका): 9 षटके, 0 मेडन, 39 धावा, 6 विकेट, गकेबेरहा, 27 नोव्हेंबर 2013
- थिसारा परेरा (श्रीलंका): 10 षटके, 0 मेडन, 44 धावा, 6 विकेट, पल्लेकेले, 9 जून 2012
- कार्ल रॅकमॅन (ऑस्ट्रेलिया): 8.2 षटके, 2 मेडन, 16 धावा, 5 विकेट, एडिलेड, 30 जानेवारी 1984
- सौरव गांगुली (भारत): 10 षटके, 3 मेडन, 16 धावा, 5 विकेट, टोरंटो, 18 सप्टेंबर 1997




