IND vs WI : चुकीला माफी नाही…! वेस्ट इंडिजच्या खेळाडूला जैस्वालसोबत पंगा घेणं पडलं महागात, आयसीसीने केली कारवाई

ICC Action on Jaden Seales in IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सला पहिल्याच दिवशी केलेली चूक भोवली आहे. कारण त्याच्यावर आयसीसी आचारसंहितेच्या उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली. भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या दिशेने आक्रमकपणे चेंडू फेकल्याप्रकरणी सील्सला त्याच्या मॅच फिच्या २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट ठोठावण्यात आला.
नेमकं काय घडलं होतं?
सामन्यादरम्यान, यशस्वी जैस्वाल क्रीझवर फलंदाजी करत असताना सील्सने त्याच्याविरुद्ध अनावश्यक आक्रमक वर्तन दाखवले. खेळाडूच्या दिशेने आक्रमकपणे चेंडू फेकणे हे आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन मानले जाते. सामनाधिकारी आणि पंचांनी याची नोंद घेतल्यानंतर सील्सवर ही कारवाई करण्यात आली.
अगोदरही मिळाला होता डिमेरिट पॉइंट –
यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही सील्सला असाच एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता. आयसीसीच्या नियमांनुसार, २४ महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास खेळाडूला निलंबनाला सामोरे जावे लागते. सध्या सील्सच्या नावावर दोन डिमेरिट पॉइंट्स असून, पुढील दोन वर्षांत आणखी दोनदा उल्लंघन झाल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.
हेही वाचा – IND W vs AUS W : नाद करा पण स्मृतीचा कुठं! किंग कोहलीलाही मागे टाकत रचला नवा इतिहास
वेस्ट इंडिज तिसऱ्या दिवसअखेर ९७ धावांनी पिछाडीवर –
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव कुलदीप यादवच्या फिरकीसमोर २४८ धावांत गारद झाला. यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवसखेर फॉलो-ऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने दोन विकेट्स गमावून १७३ धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारतापेक्षा ९७ धावांनी मागे आहे. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. कॅम्पबेल ८७ आणि होप ६६ धावांवर नाबाद आहेत.





