जयंत पाटील नाराज? विजय वडेट्टीवार थेटच बोलले म्हणाले…आपण फक्त अंदाज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून आजकाल नाराजी जाणवत आहे, त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? आपण फक्त अंदाज बांधू शकतो, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केले आहे. नागपूरमध्ये त्यांनी प्रसार माद्यांमाशी सवांद साधला.
शक्तीपीठ मार्गाच्या विरोधातल्या मोर्चात मुंबईत झालेल्या आंदोलनात ‘माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही’ असं वक्तव्य जयंत पाटलांनी केले होते. त्यानंतर जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील अशी चर्चा रंगली होती. अशातच आता विजय वडेट्टीवर यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना उधाण आले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, जयंत पाटील एका पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्यातून नाराजी जाणवते. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? आपण फक्त अंदाज बांधू शकतो. छत्रपती मार्गासाठी मोर्चा होता. त्या ठिकाणी मी होतो. पण कुठल्या अर्थाने ते बोलले हे मला माहित नाही. या सगळ्या बावड्या होत्या. बदनाम करण्यासाठी सत्ताधारी वावड्या उठवत असतात. कुरघोड्या सुरू असतात. मुनगंटीवार यांचे भाषण ऐकल्यावर फडणवीस यांची कृपा दिसते. त्यांच्या उपकाराखाली तर दबले आहेत. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.
पुढे म्हणाले, जुन्या कढीला कशाला ऊत देत आहात. अशा वावड्या उठवून बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आता एनसीपीत जाणार आहे अशा वावड्या उठल्यात कशा? मी कधी कोणाला भेटलोच नाही. मी काँग्रेसचा नेता आहे. इकडचा मालक तिकडे जाण्यासाठी मी एवढा मूर्ख नाही. उदय सामंत हे माझे मित्र आहे. त्यांना कधी कधी वाटतं आमच्या सोबत यावं म्हणून ते असे बोलतात. दिवस बदलतात. कधीतरी ते आमच्या सोबत येतील त्यांच्याकडे आले तर फायदा होईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार सत्तेत राहून आमचं काम हलकं करत आहेत. सरकार आणि विरोधकांची समान मागणी आहे. सरकारने न घाबरता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारावर कोठ्यावधी रुपये खर्च करतात ते 4000 कोटी कशाला घेता. आम्ही सुधीर भाऊ सोबत लढा द्यायला तयार त्यांनी रस्त्यावर उतरावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज : राधाकृष्ण विखे
दरम्यान, ‘माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही’, जयंत पाटील यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राज्यातील भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ‘टायमिंग’ साधत शरद पवार यांना डिवचलं आहे. “जयंत पाटलांचा कदाचित शरद पवारांना सूचक असा इशारा दिलेला दिसतो आहे. पवारांनी सतर्क राहण्याची गरज आहे”, असा मंत्री राधाकृष्ण विखेंनी म्हटलं आहे.





