‘जवान’चा दिग्दर्शक अॅटली दुसऱ्यांदा होणार बाबा; शेअर केली खास पोस्ट

Atlee Instagram Post | दिग्दर्शक अॅटलीचा ‘जवान’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानने 2023 मध्ये दमदार कमबॅक केले. या चित्रपटाला प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली. यानंतर आता अॅटली चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
अॅटली लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अॅटली-प्रिया यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी त्याचा जन्म झाला होता. पहिल्या लेकाच्या जन्मानंतर आता तीन वर्षांनी अॅटली-प्रिया नव्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पत्नीबरोबरचे फोटो शेअर करीत त्यानं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यातील एका फोटोमध्ये प्रिया आणि अॅटली यांच्यासह त्यांचा तीन वर्षांचा मुलगा मीर दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अॅटलीने पो म्हंटले की, “आमच्या घरात आणखी एक सदस्य येत आहे. हो! आम्ही पुन्हा आई-बाबा होणार आहोत. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद हवे आहेत.”
View this post on Instagram
तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये अॅटली म्हणाला की, “आमच्या घरात लवकरच आणखी एक सदस्य येणार आहे, त्यामुळे आमच्या घरात आणखी आनंद येणार आहे. आम्ही पुन्हा आई-बाबा होणार आहोत. तुमचे सर्व आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना हवे आहेत.” दरम्यान, या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिग्दर्शक अॅटलीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर त्यानं शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अलीकडेच तो वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटातून तो निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला.
हेही वाचा:
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक सासू-सासऱ्यांच्या भूमिकेत; लेकाचा साखरपुडा संपन्न





