AA22xA6 : पुष्पा आणि पुष्पा २ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर आयकॅान स्टार अल्लू अर्जून त्याच्या आणखी एका चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. AA22xA6 असे या चित्रपटाचे सध्याचे नाव असून, चित्रपटाच्या अनोख्या नावामुळे चित्रपटाची मोठी चर्चा केली जात आहे. अशातच या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत हॅालिवूडमधील प्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. वील स्मिथ हा हॅालिवूडमधील प्रसिद्ध कलाकार खलनायकाच्या भूमिकेत दिसू शकतो, असे सांगितले जात आहे. वील स्मिथ त्याच्या “द पर्सुइट ऑफ हॅपीनेस, अली, मेन इन ब्लॅक, इंडिपेंडन्स डे अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो. यामुळे वीलची AA22xA6 या चित्रपटात एन्ट्री झाल्यास त्याचा मोठा फायदा चित्रपटाला मिळू शकतो. या चित्रपटात बॅालीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकुरही दिसणार आहे. AA22xA6 हा एक बिग बजेट अॅक्शन चित्रपट असून चित्रपटाचे बजेट तब्बल ८०० कोटींचे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली करणार आहे. ज्याने आधी अनेक मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे. त्याच्या बहुतांशी चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवर तगडी कमाई केली आहे. हेही वाचा : “ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे नुकसान झालेला एक तरी फोटो दाखवा…” ; अजित डोभाल यांनी दिले थेट आव्हान