MI vs SRH : जस्सीला चीयर कण्यासाठी स्टेडियमध्ये पोहोचला ‘लिटिल बुमराह’, PHOTOS होतायेत व्हायरल

MI vs SRH Jasprit Bumrah son Angad cheers him with Sanjana Ganesan : आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान बुमराहने या सामन्यात ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २१ धावा देऊन हेनरिक क्लासेनची मोठी विकेट्स घेतली. यावेळी बुमराहचा मुलगा अंगदही त्याला चीयर करताना दिसला, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. बूम-बूम बुमराह या हंगामात पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात बुमराहचा मुलगा अंगद वानखेडे स्टेडियमध्ये त्याला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये आला आहे. अंगद बुमराहचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये बुमराहची पत्नी संजना मुलगा अंगदसोबत दिसत आहे.
अंगद वडील बुमराहला चीयर करताना दिसला –
Angad Bumrah is here 😍#MIvSRH #MIvsSRH pic.twitter.com/vOvuutNqBw
— Mumbai Indians FC (@MIPaltanFamily) April 17, 2025
संजना अंगदचे दोन्ही हात वर करून त्याला मुंबई इंडियन्सला चीयर करताना दिसत आहे. बुमराह आणि संजना २०२३ मध्ये पालक झाले. ४ सप्टेंबर २०२३ रोजी संजनाने अंगदला जन्म दिला, याची माहिती स्वतः बुमराहने ट्विट करुन दिली होती. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकला होता. आता त्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्स संघाची ताकद वाढली आहे.
हेही वाचा –
बुमराह पहिल्यांदाच लयीत दिसला –
ANGAD BUMRAH CHEERING FOR JASPRIT BUMRAH !
What a bowl to dismiss Heinrich Klassen, He dismissed Klassen for the first time in T20 Cricket#JaspritBumrah #BCCI #T20Cricket #BCCI #SRHvsMI #MIvsSRH pic.twitter.com/6bfAALeZg5
— Priyanshu Kumar (@priyanshusports) April 17, 2025
आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात बुमराह पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला. बुमराहने अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली, त्याने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त २१ धावा दिल्या. या वेळी, जस्सीने हेनरिक क्लासेनला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तथापि, गेल्या सामन्यात बुमराहची धुलाई झाली होती. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ षटकांत ४४ धावा दिल्या होत्या.





