Jasprit Bumrah’s revelation about test captaincy : रोहित शर्माने गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा ज्येष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुढील कसोटी कर्णधार म्हणून पाहिले जात होते. मात्र, नंतर शुबमन गिलला कसोटी संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. खरेतर, बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, परंतु बुमराहने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला. जस्सीने यामागील कारण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
जसप्रीत बुमराहने सांगितले कारण –
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीपूर्वी मी बीसीसीआयशी चर्चा केली होती. मी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुढे जाण्यासाठी माझ्या कार्यभाराबाबत बोललो. माझ्या पाठीच्या उपचारांचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांशीही मी चर्चा केली. आम्ही असा निष्कर्ष काढला की, आम्हाला अधिक हुशारीने काम करावे लागेल.”
हे संघासाठी योग्य नाही – जसप्रीत बुमराह
JASPRIT BUMRAH ON WHY HE DIDN’T BECOME THE TEST CAPTAIN; [Sky Sports]
“Before Rohit & Virat retired – During the IPL, I had spoken to BCCI, that I have discussed about workload going forward in a five-match Test series, I have spoken to people who manage my back – we came to… pic.twitter.com/RfaPyDNKHO
— Johns. (@CricCrazyJohns) June 17, 2025
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, “त्यानंतर मी बीसीसीआयला सांगितले की, मला नेतृत्वाची भूमिका नको, कारण मी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही. बीसीसीआय मला नेतृत्वाच्या भूमिकेत पाहत होते, पण मी त्यांना नकार दिला. कारण, जर कोणी तीन कसोटींसाठी नेतृत्व केले आणि उरलेल्या सामन्यांसाठी दुसऱ्याला नेतृत्व करावे लागले, तर ते आदर्श नाही. हे संघासाठी योग्य नाही, कारण मी नेहमी संघाला प्राधान्य देतो.”
हेही वाचा – SL vs BAN 1st Test : मुशफिकुर रहीमने श्रीलंकेत रचला इतिहास! शतक झळकावत मोडला मोहम्मद अशरफुलचा विक्रम
जस्सीवर असणार सर्वांचे लक्ष –
जसप्रीत बुमराह सध्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र, तो या दौऱ्यावर सर्व पाच कसोटी सामने खेळणार नाही. असे मानले जाते की तो तीन ते चार कसोटी सामने खेळू शकतो. आपल्या पाठीच्या समस्येमुळे तो याबाबत निर्णय घेईल. तरीही, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवान गोलंदाजी युनिटची जबाबदारी त्याच्यावर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.