Suryakumar Yadav is suffering from a sports hernia : भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये अप्रतिम फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई इंडियन्ससाठी त्याने अनेक अविस्मरणीय खेळी खेळी साकारल्या आणि हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, आता सूर्यकुमार यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याला गंभीर दुखापत झाली असून, यामुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव स्पोर्ट्स हर्नियाने त्रस्त –
अहवालानुसार, सूर्यकुमार यादव सध्या डाव्या बाजूच्या स्पोर्ट्स हर्नियाच्या उपचारांसाठी लंडनमध्ये आहे. त्याला काही आठवडे मैदानाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे. ३४ वर्षीय सूर्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील विश्रांतीचा उपयोग आपल्या रिकव्हरी आणि दीर्घकालीन तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करत आहे. न्यूज24 च्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवचा उपचार पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे आणि ऑगस्टपर्यंत तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.
Breaking News :
Suryakumar Yadav Is In England For His Sports Hernia Treatment.
Currently He Is On Break, His Treatment Will Start Next Week.
Right Side Sports Hernia This Time.
He Will Be Back On The Field By Early August. pic.twitter.com/Vtc8OB39Se
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) June 17, 2025
रिकव्हरीसाठी दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो –
बीसीसीआयने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही, परंतु अहवालानुसार, उपचार प्रक्रियेसाठी दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. सूर्यकुमार यादवसाठी हा योग्य काळ आहे, कारण ऑगस्टपर्यंत भारतीय संघ कोणतीही टी-२० मालिका खेळणार नाही. ऑगस्टमध्ये भारतीय संघ व्हाईट-बॉल मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात मालिका होतील. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हे सर्व २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीचा भाग आहे.
हेही वाचा – Ayan Raj : ‘वैभव सूर्यवंशी’च्या मित्राने केला कहर! अवघ्या १३ व्या वर्षी त्रिशतक ठोकत उडवून दिली खळबळ
टी-२० सायकलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची संधी –
सध्या सूर्यकुमार यादवचा उपचार प्रक्रियेतून जाण्याचा निर्णय रणनीतिक आहे, ज्यामुळे त्याला आगामी महत्त्वाच्या टी-२० सायकलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची संधी मिळेल. त्याची अनुपस्थिती निश्चितच जाणवेल, कारण हा मुंबईचा स्टार फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहे. विशेषतः आयपीएल २०२५ हंगामात त्याने अप्रतिम कामगिरी केली. मुंबई इंडियन्सकडून खेळताना, सूर्यकुमारने १६ सामन्यांमध्ये ६५.१८ च्या सरासरीने आणि १६७.९ च्या स्ट्राइक रेटने ७१७ धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने सर्व १६ डावांमध्ये २५ किंवा त्याहून अधिक धावा करत टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला.