टोकियो – जपानच्या कुरिल बेटाला आज भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद ६.३ रिश्टर इतकी झाली, असे राष्ट्रीय भूगर्भशास्त्र केंद्राने म्हटले आहे. दुपारी पावणे ३ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटरवर होता. या भूकंपामुळे कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच त्सुनामी लाटा उसळण्याची देखील कोणतीही शक्यता वर्तवण्यात आली नाही.