Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये एक भीषण अपघात (Jammu Kashmir Accident) घडला आहे जिथे किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून २५० मीटर खाली खोल दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण ४० लोक प्रवास करत होते. दरम्यान, आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह दरीतून काढण्यात आले आहेत. तर ६ जण गंभीर जखमी आहेत.
घटनास्थळी अद्यापही बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जिल्ह्यातील किश्तवाड आणि जीएमसी दोडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलीय.
ही बस किश्तवाडहून जम्मूला जात होती, यावेळी टेकडीवर चढाई आणि वळण एकत्र असल्यामुळे ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण गेलं. त्यामुळं ही बस २५० मीटर खाली दरीत कोसळली. हा अपघात दोडा जिल्ह्यातील असर भागातील त्रुंगल येथे झाला आहे.
The bus accident in Doda, Jammu and Kashmir is distressing. My condolences to the families who have lost their near and dear ones. I pray that the injured recover at the earliest.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. Rs.…
— PMO India (@PMOIndia) November 15, 2023
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी’तून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. या अपघाताच्या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
”जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे झालेला बस अपघात दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.