Rajasthan Royals : IPL 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्सला आणखी एक धक्का! राहुल द्रविडनंतर ‘या’ दिग्गजाने दिला राजीनामा

जेक लश मॅक्रम यांची राजस्थान रॉयल्ससोबतची कारकीर्द –
इंग्लंडमध्ये जन्मलेले जेक लश मॅक्रम 2018 पासून राजस्थान रॉयल्सशी जोडले गेले होते. त्यांनी 1 जुलै 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते फ्रँचायझीच्या मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून कार्यरत होते. मॅक्रम यांनी राजस्थान रॉयल्सच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी फ्रँचायझीला पुढे नेण्यासाठी आणि आयपीएलमधील सहभागाचे व्यवस्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली.
RR CEO JAKE LUSH McCRUM RESIGNS 😲
After Head Coarch Dravid Rajasthan Royals CEO also parts way with franchise #RR #JakeLushMcCrum #Royals pic.twitter.com/7iQvbMLUsR
— Cricmango (@cricmango) September 9, 2025
जेक लश मॅक्रम यांच्या कार्यकाळात त्यांनी एक जागतिक दर्जाची व्यवस्थापन टीम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे फ्रँचायझी आणि बोर्डाने ठरवलेली व्यापक दृष्टी प्रत्यक्षात आणण्यास मदत झाली. मॅक्रम यांनी आपला राजीनामा काही सहकारी फ्रँचायझी आणि उद्योगातील मित्रांना फोनद्वारे कळवला आहे.
हेही वाचा – Asia Cup 2025 : हाँगकाँगच्या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू
राहुल द्रविड यांचाही फ्रँचायझीला रामराम –
यापूर्वी 30 ऑगस्ट 2025 रोजी राजस्थान रॉयल्सने आपले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड़ यांच्यासोबतचा करार संपुष्टात आल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले होते की, राहुल द्रविड़ आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी फ्रँचायझीमधील आपला कार्यकाळ पूर्ण करतील. द्रविड़ यांनी अनेक वर्षे राजस्थान रॉयल्सच्या प्रवासात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या पिढीवर प्रभाव टाकला, संघात मजबूत मूल्ये रुजवली आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर अमिट छाप सोडली.
हेही वाचा – T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाच्या संभाव्य तारखा जाहीर, ‘या’ दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना
राजस्थान रॉयल्ससमोरील आव्हाने –
राहुल द्रविड़ आणि जेक लश मॅक्रम यांसारख्या प्रमुख व्यक्तींच्या राजीनाम्यामुळे राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीसमोर नवे आव्हाने उभी ठाकली आहेत. आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी फ्रँचायझीला नवीन नेतृत्व आणि व्यवस्थापनाची गरज भासणार आहे. चाहत्यांच्या नजरा आता फ्रँचायझीच्या पुढील पावलांवर असतील, कारण राजस्थान रॉयल्सला आपली यशस्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी नव्या रणनीती आणि नेतृत्वाची आवश्यकता आहे.





