इसका गेम बजाना पडेगा..! भाजप खासदाराला ठार मारण्याची धमकी; तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

BJP । police- राजस्थानातील भारतीय जनता पार्टीचे खासदार मन्नालाल रावत यांना ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. त्याने धमकी दिल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
अखेर त्याला शुक्रववारी अटक करण्यात आली. रावत यांनी भारती आदिवासी पक्षाबाबत अर्थात बीटीपीबाबत केलेल्या एका विधानामुळे हा तरूण नाराज होता. त्याने सोशल मीडियावर एक धमकीची पोस्ट टाकली होती.
कंगना रणौत की तरह इसका गेम बजाना पडेगा. इसको सांसद बनाके जनता ने गलत किया है असा मेसेज त्याने सोशल मीडियावर टाकला होता. त्यापुढेही त्याने थेट ठार मारण्याची धमकी दिली होती.
खासदार रावत यांनी पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांच्या सायबर शाखेने शोध मोहिमेला गती दिली होती. दरम्यान, राजस्थान सरकारमधील मंत्री बाबूलाल खराडी यांनाही अशीच धमकी देण्यात आली आहे. ते उदयपूरच्या झाडोल येथील आमदार आहेत.





