पुणे जिल्हा | जिव्हाळा महिना म्हणून साजरा करणार

बारामती, (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दि. १७ ते ३१ जुलै दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिव्हाळा महिना म्हणून साजरा करणार असल्याचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.
गुरुवार, दि. १८ रोजी रुई, घाडगेवस्ती येथे अमर घाडगे मित्र परिवाराचे रक्तदान शिबिर, शनिवार, दि. २०) रोजी पुणे जिल्हा प्रशिक्षण मंडळाच्या वतीने पुणे ते बारामती सायकल स्पर्धा व बक्षीस समारंभ, होलार समाजाच्या वतीने उघडा मारुतीला अभिषेक, रविवार, (दि.२१) अजिनाथ चौधर यांच्या वतीने रुई येथे वृक्षारोपण, एकता इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, सोमवार, दि. (२२) मोरयानगर येथे श्री मयूरेश्वरास अभिषेक,
जळोची येथे ग्रामदैवत महाकालेश्वरास अभिषेक, सिद्धेश्वर मंदिर येथे महादेवाला अभिषेक, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जळोची क्षेत्रीय कार्यालयासमोर महाअभिषेक व वृक्षारोपण, चाँदशाहवली दर्गा येथे चादर अर्पण, स्वामी समर्थ – मठात अभिषेक, राष्ट्रवादी भवन-कसबा येथे केक कापणे, जळोची येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,
सिल्व्हर-ज्युबिली हॉस्पिटल येथील रुग्णांना-फळे व मिठाई वाटप, अवचर – इस्टेट येथे स्वच्छता अभियान, साठेनगर अंगणवाडी येथे लहान मुलांना खाऊ वाटप, श्रीमंत आबा गणपतीला अभिषेक, गुरुद्वारात अखंड पाठ, भिगवण चौक गणेशोत्सवात गणपतीची आरती, संतोष गालिंदे यांच्याकडून २५ दत्तक विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शालेय खर्च केला जाणार आहे. रोज सामाजिक कार्यक्रम असणार आहेत, असे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले.





