भाजप नेत्यांनीच एकनाथ शिंदेंचा ‘तो’ घोटाळा समोर आणला; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काल चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर सभागृहात दिशा सालियनचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यापूर्वी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना केलेल्या एका भूखंड वाटपावरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले होते.
यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली होती. ‘हातात श्रीखंडाचे डब्बे घेऊन भूखंडाचे ‘श्रीखंड खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांनी… मुख्यमंत्र्यांनी…’ अशा घोषणा दिल्या गेल्या. दरम्यान, याच मुद्द्यावर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “भूखंडाबाबत गैरव्यवहार झाल्याचा ठपका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ठेवण्यात आलाय, त्याची पीआयएल सर्वात आधी भाजपच्याच लोकांनी दाखल केली होती, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. भूखंडाचा श्रीखंड वगैरे आरोप केले जातायत…
तो मॅटर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात आत्ता एकनाथ शिंदेंसोबत ज्या भाजपने सरकार स्थापन केलंय.. त्यांच्यातल्याच काही लोकांनी ती पीआयएल दाखल केली होती. असं यावेळी अजित पवार म्हणाले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या या व्यक्तव्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठी ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





