हातात तलवार घेऊन ‘शक्तिप्रदर्शन’ करणं पडलं महागात; आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
Updated On:

मुंबई – हिंगोलीतील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार संतोष बांगर यांनी काल (28 ऑगस्ट) कावड यात्रा काढून मोठे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमदार असलेल्या संतोष बांगर यांनी नंगी तलवार फिरून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर आता प्रचंड टीका केली जात असून, कळमनुरी पोलिसांत गुन्हा बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत जनसमुदायासमोर हातात तलवार घेवून उंचावल्याने व डीजे लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. पोलिस हवालदार सतीश पांडुरंग शेळके यांनी तक्रार नोंदविली आहे. तपास पोलिस निरीक्षक मुंडे ही करीत आहेत.





