‘खेळाडूंसोबत असे गैरवर्तन करणे योग्य नाही…’, 1983 चा विश्वचषक विजेता क्रिकेट संघ पैलवानांच्या समर्थनार्थ मैदानात

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध दिल्ली येथे भारतीय कुस्तीपटूंनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु आद्यपही ब्रृजभूषणसिंग यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
29 मे रोजी भारताच्या नवीन संसदेचे उदघाटन झाले. याच दिवशी आंदोलनकर्त्या खेळाडूंनी नवीन संसद भवनाच्या आवारात महिला पंचायत भरवण्याचा प्रयन्त केला होता. परंतु पोलीसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव लौकिक मिळवून देणारे कुस्तीपटू दिल्लीच्या रस्त्यावर ठाण मांडून आहेत.कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी तसेच मोठमोठ्या खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे.
तसेच दोन दिवसापूर्वी भारताचे माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच आज भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने कुस्तीगिरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्याबद्दलचे निवेदन जारी केले आहे.
1983 क्रिकेट विश्व कप विजेता टीम ने पहलवानों के विरोध पर बयान जारी किया – “हम अपने चैंपियन पहलवानों के साथ मारपीट के अशोभनीय दृश्यों से व्यथित और परेशान हैं। हमें सबसे अधिक चिंता इस बात की भी है कि वे अपनी मेहनत की कमाई को गंगा नदी में बहाने की सोच रहे हैं। उन पदकों में वर्षों का… pic.twitter.com/gqiTvVtluO
— ANI_HindiNews (@AHindinews) June 2, 2023
‘खेळाडूंसोबत गैरवर्तन करू नका, देश कायद्यानुसार चालू द्या’ –
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने जरी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि ‘आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना अतिशय गैरवर्तन पद्धतीने वागणूक देण्यात आली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. हे कुस्तीपटू आपल्या कष्टाने कमावलेली पदके गंगा नदीत फेकण्याचा विचार करत आहेत या वस्तुस्थितीबद्दल आम्हाला खूप चिंता वाटते.
त्या पदकांमध्ये त्यांची अनेक वर्षांची मेहनत, त्याग, दृढनिश्चय आणि संयम यांचा समावेश आहे. यासोबतच ते पदकं फक्त पैलवानांचा गौरव नसून आपल्या देशचाही गौरव आहे. त्यामुळे पदकांबाबत कुस्तीपटूंनी कोणतेही निर्णय घाई-घाईने घेऊ नये, असे आवाहन आम्ही त्यांना करतो. तसेच या कुस्तीगिरांच्या तक्रारी लवकरात-लवकर ऐकून त्या सोडवल्या जातील व देश कायद्यानुसार चालेल अशी आशा आम्हाला आहे’.
दरम्यान, दिल्लीच्या जंतर- मंतर या मैदानावर अनेक दिवसांपासून भारतीय कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. तसेच 29 मे रोजी भारताच्या नवीन संसदेचे उदघाटन झाले. याच दिवशी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाच्या आवारात महिला पंचायत भरवण्याचा प्रयन्त केला होता. परंतु पोलीसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली असून त्यांच्या सोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सुरु असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन आणखी चिघळले आहे





