Israel strikes : सीरियाच्या दक्षिणेकडे इस्रायलचा मारा ! ३० हून अधिक मृत्यू तर, १०० जण गंभीर जखमी

Israel strikes – सीरियाच्या दक्षिणेकडील भागात सरकारी फौजांनी द्रूझ बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू केली असून इस्रायलने सीरियातील या संघर्षात हस्तक्षेप केला आहे. सीरियाच्या लष्कराचा भाग असलेल्या रणगाड्यांवर इस्रायलने मारा केल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.
सीरियाच्या स्वेदा प्रांतात स्थानिक सशस्त्र बंडखोर आणि द्रूझ वंशिय गटांमधील संघर्षात डझनभर लोक मारले गेले आहेत. परिस्थिती सामान्य करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सरकारी सुरक्षा दलांची स्थानिक सशस्त्र गटांशीही सोमवारी चकमक झाली.
या संघर्षात ३० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि जवळपास १०० जण जखमी झाले असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. दोन मुले आणि सुरक्षा दलातील सहा सदस्यांसह किमान ५० जणांचा मृत्यू झाला असल्याचे सीरिया ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राईटस या ब्रिटनमधील निरीक्षक गटाने म्हटले आहे.
शुक्रवारी दमास्कस ते स्वेदा यांना जोडणाऱ्या महामार्गावर एका द्रूझ व्यापाऱ्याचे अपहरण झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. द्रूझ समुदायाच्या रक्षणासाठी इस्रायलने सीरियाच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या सरकारी फौंच्या रणगाड्यांवर रॉकेटचा मारा केल्याचे वृत्त आहे. या संदर्भात सीरियातल्या नवीन सरकारकडून तीव्र संताप व्यक्त केला गेला आहे.
द्रूझ वंशियांसाठी इस्रायलचा पुढाकार
द्रूझ वंशियांच्या हितासाठी या संघर्षात हस्तक्षेप करण्याचा इशारा इस्रायलने यापुर्वी दिला होता. जगभरातील तब्बल १० लाख द्झ वंशियांपैकी निम्मे सीरियामध्ये रहात आहेत. अन्य द्रूझ ऽंशीय लेबेनॉन आणि इस्रायलमध्ये राहतात. यात गोल्डन हाईटसमध्ये राहणाऱ्यांचाही समावेश आहे.
इस्रायलने गोलान १९६७ मध्ये झालेल्या मध्यपूर्वेतील युद्धाच्यावेळी हाईटसवर ताबा मिळवला आणि १९८१ मध्ये या टेकड्या अधिकृतपणे काबीज केल्या. इस्रायलमध्ये द्रूझ समुदाय हा एक प्रामाणिक समाज म्हणून ओळखला जातो. इस्रायलच्या लष्करामध्येही द्रूझ समुदायाचे प्रमाण जास्त असते.





