देर अल-बलाह (गाझा पट्टा) – गाझा पट्ट्यात सक्रिय असलेल्या अखेरच्या रुग्णालयावर इस्रायलच्या सैन्याने काल छापा घातला आणि तेथे कार्यरत असलेले कर्मचारी आणि रुग्णांना बाहेर हुसकावून लावले. इस्त्रायली सैन्याने कमल अडवानच्या प्रयोगशाळा आणि शस्त्रक्रिया विभागासह अनेक भागांमध्ये आग लावली, असा आरोप गाझा पट्ट्यातील आरोग्य मंत्रालयाने केला. मात्र इस्रायलच्या सैन्यदलाने रुग्णालयात घुसल्याचा किंवा इमारतीला आग लावल्याचा दावा फेटाळून लावला आहे. उलट या रुग्णालयाचा वापर हमासकडून केला जात असल्याचा आरोपही इस्रायलच्या सैन्याने केला आहे. गाझा पट्ट्यातील कमाल अडवान रुग्णालयावर गेल्या तीन महिन्यात इस्रायली सैन्याकडून अनेक वेळा छापे घालण्यात आले आहेत. हमासच्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी या रुग्णालयाच्या आवाराला वेढाही घालण्यात आला होता. आजच्या छाप्याच्या एक दिवस आगोदरच झालेल्या माऱ्यात रुग्णालयातील ५ वैद्यकीय कर्मचारी मारले गेले होते, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या काही रुग्णांची प्रकृती ठीक नाही. रुग्णालयात आग लावली गेल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्याचे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. हमासच्या पायाभूत सुविधा आणि या भागातील अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली जात असून आणि लोकांत्यासाठीच या रुग्णालयातून रुग्णांना बाहेर काढण्याचे आदेश दिले असल्याचे इस्रायलच्या सैन्याने सांगितले. या रुग्णालयात हमासचे दहशतवादी कार्यरत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही इस्रायलने केला मात्र त्याते कोणतेही पुरावे दिले नाहीत. रुग्णांना बाहेर हसकावून कपडे काढले : इस्रायलच्या सैन्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात बळजबरीने नेले आणि त्यांचे कपडे काढायला भाग पाडले. त्यातील काही जणांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. तर काही रुग्णांना जवळच्या इंडोनेशिया हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आले. इस्रायलने गेल्याच आठवड्यात या रुग्णालयावरही कारवाई केली होती. तेंव्हापासून हे रिग्णालय रिकामेच होते. अशा छाप्यांच्यावेळी इस्रायली सैन्याकडून नेहमीच पुरुषांना कपडे काढायला लावून त्यांची झडती घेतली जात असते.