Israel-Hezbollah War : युद्ध भडकले..! इस्रायलचा लेबेनानमध्ये रॉकेट हल्ला तर हेजबोलाकडून ड्रोन माऱ्याने प्रत्युत्तर…

जेरुसलेम – इस्रायलने आज सकाळी लेबेनानच्या दक्षिणेकडील भागात रॉकेटचा जोरदार मारा केला. हेजबोलाची ताकद संपवण्याच्या उद्देशाने इस्रायलने हा रॉकेट हल्ला केला होता. मात्र इस्रायलच्या या हल्ल्यामुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गाझातील युद्धबंदीचे प्रयत्न विफल ठरू शकतात.
हेजबोलाकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची तयारी केली जात होती, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. लेबेनानच्या माध्यमांनीही दक्षिणेकडील भागात मोठ्या रॉकेट हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या हल्ल्यात जीवित अथवा मालमत्तेची काय हानी झाली, याचा तपशील जाहीर केला गेला नाही.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर थोड्याच वेळात हेजबोलाने इस्रायलवर मोठा ड्रोन हल्ला केल्याचे जाहीर केले. हेजबोलाचा वरिष्ठ कमांडर फौआद शुकूरच्या हत्येची हेजबोलाकडून देण्यात आलेली ही पहिली प्रतिक्रिया होती. इस्रायलच्या सैन्याशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हा ड्रोन हल्ला केल्याचे हेजबोलाने म्हटले आहे. एकूण किती ड्रोन डागली गेली, हे नंतर जाहीर केले जाणार असल्याचेही हिज्बुल्लाने म्हटले आहे.
Unofficial Test (AUS A vs IND A) : टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा एकमेव कसोटीतही पराभव….
दरम्यान हमास आणि इस्रायलमधील युद्धबंदीसंदर्भातल्या वाटाघाटींसाठी इजिप्तमध्ये चर्चेची पुढची फेरी सुरू झाली असतानाच हे हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. हेजबोलाला उत्तर देण्यासाठी इस्रायलने लेबेनान सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले गेल्याचे इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.





