Israel Hezbollah War : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाहचे प्रमुख ६ कमांडर ठार

Israel Hezbollah War – हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. आज इस्रायली सैन्याने हिजबुल्लाच्या स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्त्रायलच्या लष्कराने म्हणजेच आयडीएफने सांगितले की, लेबनॉनमधील या हल्ल्यात 50 हिजबुल्लाह दहशतवादी मारले गेले आहेत.
इस्रायलच्या या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे सहा प्रमुख कमांडर मारले गेले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अहमद हसन नाझल, जो बिंट जबेल क्षेत्राचा प्रभारी होता आणि इस्रायलवर हल्ले करत होता, त्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
या हल्ल्यात गजर सेक्टर प्रभारी हसीन तलाल कमाल, मुसा दिव बरकत, महमूद मुसा कार्निव्ह आणि बिंट जबेल सेक्टर आर्टिलरी प्रभारी अहमद इस्माईल आणि अब्दुल्ला अली डिकीक हे देखील मारले गेले.
आयडीएफने हिजबुल्लाहच्या दक्षिणी आघाडीवरील स्थानांनाही लक्ष्य केले जेथे त्यांनी पायाभूत सुविधा आणि भूमिगत मुख्यालय राखले. याशिवाय हिजबुल्लाच्या अझीझ युनिटचे ५० तळ आणि नासेर युनिटचे ३० तळही उद्ध्वस्त करण्यात आले.





