West Asia Crisis – अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अन्य शहरातील आपले हल्ले सुरू ठेवले असून युद्धाच्या पाचव्या दिवशी इराणच्या सुरक्षा दलांसह वरिष्ठ नेत्यांनाही या संयुक्त कारवाईत लक्ष्य केले जाऊ लागले आहे. तर या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणकडून इस्रायल आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन चा स्वैर मारा केला जाऊ लागला आहे. आज पहाटेपासून इराणची राजधानी तेहरामध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याची दृश्ये सरकारी वृत्तवाहिनीवरून दाखवली जात होती. राजधानीच्या मध्यभागात एक मोठी इमारत उद्ध्वस्त झाल्याचे या दृश्यामध्ये दाखवण्यात आले. कोम आणि अन्य काही शहरांनाही अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले. या शहरांवरून लढाऊ विमाने घोंघावत जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे युद्ध किमान महिनाभर चालेल असा अंदाज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवला असून आतापर्यंत या युद्धात ८०० लोक मारले गेले आहेत. त्यात इराणच्या नेत्यांचीही भर पडेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. US-Israel Iran War: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान ७८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये अकरा लोक मारले गेले आहेत, असे रेड क्रेसेंट सोसायटीने म्हटले आहे. कुवेतमध्ये शुएबा बंदरावर इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे ६ सैनिक मारले गेले आहेत. इराणचे लढाऊ विमान पाडले इराणच्या हवाई दलाचे वायएके-१३० लढाऊ विमान पाडल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे. इराणकडून डागल्या जात असलेल्या क्षेपणास्त्रांपासून सुरक्षेसाठी इस्रायलने आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय केली आहे. प्रणालीने इराणची अनेक क्षेपणास् ६ आणि ड्रोन हवेतच रोखली. त्यामुळे जेरुसलेमच्या परिसरात स्फोटांचे अनेक आवाज ऐकायला येत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची वाहतूक करणाऱ्या पर्शियन आखाताचे चिंचोळे तोंड असलेल्या होर्मूझ समुद्रधुनीला इराणने बंद केले असल्यामुळे ब्रंट क्रूडचे भाव प्रति बॅरल ८४ डॉलर इतके वाढले आहेत. संघर्षाला सुरुवात झाल्यापासून क्रूडच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै २०२४ पासून ही दरवाढ सर्वात जास्त प्रमाणातली आहे. Iran-Israel War इराणकडून सौदीच्या तेल प्रकल्पावर हल्ले इराणने सौदी अरेबियातल्या रास तानुरा या जगभरातल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर आज पुन्हा हल्ला केला. या आठवड्यात या प्रकल्पावर ड्रोन हल्ल्याचा एक अयशस्वी प्रयत्न इराणने केला होता. आज केलेल्या हल्ल्यामुळे या तेल शुद्धिकरण प्रकल्पाचे फारसे नुकसान झाले नाही. तसेच तेल पुरवठ्यावरही त्याचा काही परिणाम झाला नाही, असे सौदीच्या तेल मंत्रालयाने म्हटले आहे. सौदीतील अमेरिकेचा वाणिज्य दूतावास आणि यूएइमधील दूतावासावरही इराणने आज ड्रोन हल्ले केले. याठिकाणच्या आपत्कालिन कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कर्मचाऱ्यांना अमेरिकेने तेथून आगोदरच बाहेर काढले आहे. इराणने तब्बल ५०० बॅलिस्टिक क्षेपणास्६ आणि २ हजार ड्रोन आतापर्यंत डागली आहेत, असे यूएस नेव्हीचे ऍडमिरल ब्रॅड कूपर यांनी सांगितले. बहरिन आणि कतारवरही क्षेपणास्त्रांचा मारा… बहरिन आणि कतारमध्येही इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यातील एक क्षेपणास्त्र अल-उदेदी कतारी तळावर पडले. पण त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. इराणला मदत करणाऱ्या लेबेनॉनमधील हिज्बुल्लाहने केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र मारा केला. इस्रायलने बालबेक शहरातल्या रहिवाशी कॉम्प्लेक्सवर केलेल्या हल्ल्यात ५ जण ठार झाल्याचे लेबेनॉनच्या माध्यमांनी म्हटले आहे. लेबेनॉनमध्ये आतापर्यंत ५० जण ठार झाले आहेत आणि ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. कतारमधील इराणचा पाठिंबा असलेल्या साराया अवलिया अल-डाम या सशस्त्र गटाने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याच गटाने अलिकडच्या काळात बगदाद आणि इराकच्या उत्तरेकडील इर्बिल शहरावरही हल्ले केले होते. इराणी सशस्त्र दलांवर हल्ले वाढले खामेनींच्या हत्येनंतर तेथील राजवट उलथवून टाकणे हे आपले उद्दिष्टच नव्हते, असे ट्रम्प म्हणाले. खामेनींच्या जागेवर नवीन सर्वोच्च नेता निवडला गेल्यावर त्या नेत्यालाही लक्ष्य केले जाईल, असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी दिला आहे. इराणमधील स्वयंसेवी सशस्त्र गट असलेल्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित तेहरानमधील बासिज या इमारतीवर मारा केल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. रिव्होल्युशनरी गार्डने इराणमधील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हजारो आंदोलकांची हत्या केल्याचा आरोप आहे. अमेरिका-इस्रायलच्या मोहमेला मदत करणाऱ्या किंवा त्यांच्या बाजूने वक्तव्य करणाऱ्याला रिव्होल्युशनरी गार्डकडून शिक्षा केली जाईल, अशी धमकीच इराणचे न्यायिक प्रमुख घुलाम हुसेनी मोहसेनी इजेहेइ यांनी दिली आहे.