Iran-Israel War : खामेनी यांच्या मृत्युचे भारतात पडसाद; अमेरिका-इस्रायलविरोधात घोषणाबाजी, भारत सरकारने उचलले मोठे पाऊल
Iran-Israel War : इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले.

Iran-Israel War : अमेरिका-इस्रायली संयुक्त हल्ल्यात इराणी नेते खामेनी यांचा मृत्यु झाल्याच्या बातमीनंतर भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत. रविवारी काश्मीरच्या अनेक भागात निदर्शने झाली. शेकडो लोक रस्त्यावर उतरले.
शिया बहुल भागात ही निदर्शने सर्वाधिक होती. भारतातील अनेक भागात शिया समुदायातील मुस्लिमांनी खामेनी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. तसेच अमेरिका-इस्रायलविरोधात घोषणाबाजी केली.
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथेही लोक जमा झाले होते. पुलवामाच्या गंगू परिसरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत होते. या प्रकरणाची भारत सरकारने दखल घेत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध
जम्मू काश्मीरच्या श्रीनगर भागात सरकारकडून निर्बंध लावण्यात आलेत. ज्या भागात लोकांनी उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल आक्रोश केला त्या लाल चौकातील परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. क्लॉक टॉवरच्या आसपासही सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. Iran-Israel War
याशिवाय शाळा आणि कॉलेज पुढील २ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, काश्मीरमधील विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. Iran-Israel War
अनेक ठिकाणी केला जातोय विरोध
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भारतातील अनेक भागात विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथेही शिया समुदायातील लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. मौलाना कल्बे जवाब साहब यांनी लोकांना आवाहन करत रविवारी दुकाने बंद ठेवून ३ दिवस शोक पाळण्याचं आवाहन केले आहे.
दरम्यान, खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण अधिक आक्रमक झाले आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आखाती देश आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या तळांवर टार्गेट हल्ला केल आहे. तर अमेरिकेकडूनही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.
इराणने आधीच कुवेत, कतार, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Iran-Israel War






