ICC ODI Ranking – बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या ३ सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने दमदार खेळ विक्रम रचला. त्याने या सामन्यात २१० धावांची द्विशतकीय खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली. त्याच्या याच खेळीचा त्याला आयसीसीच्या नव्याने जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत ११७व्या स्थानावरून थेट ३७व्या स्थानावर झेप घेतली आहे.
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
त्याचबरोबर विराट कोहलीला देखील नव्याने जाहीर झालेल्या ( ICC ODI Ranking ) क्रमवारीत फायदा आहे. त्यानेही बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ३ वर्षानंतर एकदिवसीय क्रिकेटमधील आपले ४४वे शतक पूर्ण केले. या शतकासह विराट कोहली आता ७२ शतकांवर पोहोचला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत विराटला २ स्थानांचा फायदा झाला असून तो सध्या ८व्या क्रमांकावर आहे.
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात ईशान किशन आणि विराट कोहली या दोघांनी मिळून २९० धावांची भागीदारी रचली होती. सामन्यात विराट कोहलीने ९१ चेंडूत ११३ धावा आणि ईशान किशनने १३१ चेंडूत २१० धावांची खेळी खेळाची होती. या दोघांव्यतिरिक्त भारताच्या श्रेयस अय्यरला देखील एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत फायदा झाला आहे. तो २०व्या स्थानावरून आता १५व्या स्थानावर आला आहे. अय्यने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८२ धावांची खेळी खेळली होती.
– Virat Kohli climbs to No.8 position in ICC ODI batters rankings.
– Babar Azam & Joe Root slip to No.3 & No.4 position respectively in ICC Test batters rankings.
– James Anderson crawl to No.2 position in ICC Test bowlers rankings.#ICCRankings pic.twitter.com/gGWwZmJPaq— CricTracker (@Cricketracker) December 14, 2022
एकदिवसीय क्रिकेटच्या गोलंदाजी ( ICC ODI Ranking ) क्रमवारीत भारताच्या मोहम्मद सिराजला ४ स्थानाचा फायदा झालाअसून तो आता २२व्या स्थानावर पोहोचला आहे. फलंदाजांच्या एकदेवासीय क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा ताबा कायम आहे. त्यांच्या कर्णधार बाबर आझम पहिल्या तर इमाम उल हक दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या अव्वल १० खेळाडूंमध्ये समावेश आहे.