भारतीय संघासाठी ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारपणामुळे चक्क रुग्णालयात दाखल आहे. जर इशान किशन दुखापतीमुळे बाहेर बसला, तर संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात कोण करणार? हा मोठा प्रश्न कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर असेल.दिलासादायक बाब म्हणजे, आजारपणातून सावरून जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर नामिबियाविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत.
\n\nदुखापतींची मालिका सुरूच –
\n\n\nInjury scare for Ishan Kishan after he takes a toe-crushing yorker from Jasprit Bumrah. 🤕👀#INDvNAM #IshanKishan #Sportskeeda pic.twitter.com/oEeGNU3y0H
\n— Sportskeeda (@Sportskeeda) February 11, 2026
\nयंदाच्या विश्वचषकात भारतीय खेळाडूंच्या दुखापतींनी संघाची डोकेदुखी वाढवली आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आधीच दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तिलक वर्मा आणि सुंदर नुकतेच सावरून संघात परतले आहेत. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी प्रमुख खेळाडू जखमी होणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.