Ishan Kishan Century : इशान किशनचा कहर! ७ चेंडूत ७ बाउंड्री अन् ४२ चेंडूत ठोकलं ऐतिहासिक शतक; ईश सोढीची केली धुलाई
Ishan Kishan Century : इशान किशनने न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

Ishan Kishan Century against New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने नावाप्रमाणेच ‘इशान्य’ वादळ मैदानात आणले. दुखापतीमुळे मागील सामन्यात बाहेर असलेल्या इशानने पुनरागमन करताच किवी गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. त्याने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावताना अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली.
ईश सोढीच्या एका षटकात कुटल्या २९ धावा!
भारतीय डावाच्या १२ व्या षटकात इशान किशनने न्यूझीलंडचा अनुभवी फिरकीपटू ईश सोढीला लक्ष्य केले. या षटकात ईशानने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. षटकातील पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर सलग चेंडूवर सलग ३ चौकार मारले. तर चौथ्या चेंडूवर षटकार मारला. यानंतर पाचव्या चेंडूवर चौकार खेचला षटकाचा शेवट खणखणीत षटकाराने केला. अशा प्रकारे या एक षटकात इशानने तब्बल २९ धावा कुटल्या. यासह ईश सोढीच्या नावावर न्यूझीलंडसाठी सर्वात महागड्या षटकाचा नकोसा विक्रमही नोंदवला गेला.
७ चेंडूत ७ बाउंड्रीचा अजब विक्रम –
🎥 What a way to get to your maiden T20I century! 💯
And look what it means to Ishan Kishan 🙌
Updates ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/adZg0TJTvK
— BCCI (@BCCI) January 31, 2026
इशान किशन इथेच थांबला नाही. सोढीच्या षटकात सलग ६ चेंडूंवर बाउंड्री (चौकार/षटकार) मारल्यानंतर, पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पुन्हा षटकार ठोकला. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ७ चेंडूंवर ७ बाउंड्री मारण्याचा दुर्मिळ पराक्रम त्याने केला.
अवघ्या ४२ चेंडूत ‘शतक’ पूर्ण करत रचला इतिहास –
इशान किशनने न्यूझीलंडविरुद्ध सर्वात जलद टी-२० शतक ठोकले
इशानने सुरुवातीच्या २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतरचे ५० ते १०० धावांचे अंतर त्याने अवघ्या १४ चेंडूत पार केले. त्याने एकूण ४२ चेंडूत आपले शतक साजरे केले. यासग तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. इशानने ४३ चेंडूत १०३ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांचा समावेश होता. ज्यामुळे भारतीय संघाने ५ बाद २७१ धावांचा डोंगर उभारला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.





