Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या आशिया कप निवडीवर चर्चा तापली, आकाश चोप्रा काय म्हणाले? जाणून घ्या

आकाश चोप्रा यांचे काय आहे मत?
आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना श्रेयस अय्यरच्या निवडीचे समर्थन केले. ते म्हणाले, “चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने अप्रतिम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मधल्या षटकांमध्ये त्याच्यासारखा प्रभावी भारतीय फलंदाज नव्हता. तो प्रतिस्पर्धी संघावर हल्ला करत होता, वाटेल तेव्हा चौकार मारत होता आणि दुसऱ्या बाजूच्या फलंदाजावरील दबाव कमी करत होता.”
India needs his calm head and big-match temperament. 💙🇮🇳 #ShreyasIyer #AsiaCup pic.twitter.com/MEIZKRhN2M
— K.D (@KartikD1796) August 18, 2025
चोप्रा पुढे म्हणाले, “आयपीएल 2025 मध्येही त्याने दबावाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम आयपीएल हंगाम होता. टी-20 संघाची निवड अनेकदा आयपीएलच्या कामगिरीवर आधारित होते. वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन यांच्यासारख्या खेळाडूंची उदाहरणे आपण पाहिली आहेत. या दृष्टिकोनातून पाहिल्यास, श्रेयस अय्यर निश्चितपणे खेळण्यास पात्र आहे.”
श्रेयस अय्यरची टी-20 क्रिकेटमधील आकडेवारी –
9 सप्टेंबरपासून सुरू होणारा आशिया कप 2025 हा टी-20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. श्रेयस अय्यरच्या टी-20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीवर नजर टाकल्यास, त्याने भारतासाठी 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 136.12 च्या स्ट्राइक रेटने आणि 30.66 च्या सरासरीने 1104 धावा केल्या आहेत.
हेही वाचा – बुमराह-शमीचे पर्याय शोधण्यात BCCI व्यस्त, वेगवान गोलंदाजांसाठी खास शिबिराचे केले आयोजन, पाहा VIDEO
श्रेयस अय्यरच्या या प्रभावी कामगिरीमुळे आणि आकाश चोप्रा यांच्या समर्थनामुळे त्याच्या आशिया कप संघातील समावेशाबाबत उत्सुकता वाढली आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





