मुंबई – बॉलिवुडमध्ये सद्या बायोपिकची जोरदार क्रेज आहे. याआधी एम एस धोनी, कपिल देव यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींवर आधारीत बायोपिक आले आहेत. आता हॉकी लिजेंड ध्यानचंद यांचा बायोपिक येणार आहे. यामध्ये अभिनेता ईशान खट्टर ध्यानचंद यांची भूमिका साकारणार आहे. निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि अभिषेक चौबे यांनी डिसेंबर महिन्यात ध्यानचंद यांचा बायोपिक तयार करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटात ध्यानचंद यांची व्यक्तिरेखा ईशान खट्टर साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. चित्रपटाकरता ईशान लवकरच अनेक गोष्टींचे प्रशिक्षण घेणार आहे. ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असे म्हटले जाते. भारताच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव असलेले ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबद्दल लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नोव्हेंबर महिन्यात याचे चित्रिकरण सुरू होणार आहे.