“फ्लॉप हिरो…”; शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर ‘त्या’ कृतीमुळे ट्रोल

Ishaan Khattar | अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लॅक्मे फॅशन वीकच्या शोमुळे सध्या चर्चेत आला आहे. रॅम्प वॉर करताना त्याने केलेल्या एका कृतीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यावेळी ईशानने अचानक शर्ट काढला आणि बॉडी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यानंतर त्याच्यावर टीका केली जात आहे.
ईशानने रॅम्प वॉर करताना नारंगी रंगाचं प्रिंटेड शर्ट आणि बॅगी ट्राउजर परिधान केली आहे. त्यावर त्यानं त्याचं रंगाचं एक जॅकेट परिधान केलं होतं. रॅम्पच्या सेन्टरला आल्यानंतर ईशाननं त्याच्या शर्टाचे बटन उघडले आणि शर्ट काढलं. त्यानंतर कंपनीचं प्रोडक्ट त्याच्या बॉडीवर लावले. यावरुन नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर कमेंट करत म्हंटले की ‘कपडे काढण्याची काय गरज होती.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जर शर्ट परिधान केलंच नाही तर काय फायदा इतका मोठा सेट बनवण्याचा.’ आणखी एक ‘ईशान फ्लॉप हीरो आहे. ना उंची, ना कॉन्फिडन्स ना अॅटिड्यूड. कशाला घेतात अशा लोकांना?’, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. तर काहींनी ‘हॅन्डसम आणि क्यूट’ म्हणत त्याचे कौतुकही केले आहे. Ishaan Khattar |
हेही वाचा :





