Rajkummar Rao | भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांची ‘दादा’ म्हणून ओळख आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या बायोपिकची चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. यात सौरव गांगुलीची भूमिका राजकुमार राव साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. राजकुमार राव यांनी केली पुष्टी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, “मी ही बायोपिक करत आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलोय. खूप मजा येणार आहे. नक्कीच ही आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे मी थोडा नर्व्हस आहे. पण त्यापेक्षा जास्त उत्साहित आहे. यावेळी राजकुमार राव यांनी चित्रपटासाठी बंगाली शिकण्यात आलेल्या अडचणींचाही उल्लेख केला. मात्र, त्याच्यासाठी हे फारसे अवघड नव्हते, कारण त्यांची पत्नी पत्रलेखा ही देखील बंगाली आहे. त्यामुळे ते आपल्या पत्नीकडून बंगाली शिकतात. तरीही, या भूमिकेसाठी स्वतःला तयार करणे राजकुमारसाठी आव्हानात्मक होते. Rajkummar Rao | सौरव गांगुलीने आधीच दिली होती माहिती यापूर्वी सौरव गांगुलीने स्वतः त्यांच्या बायोपिकबाबत बोलताना सांगितले होते की. राजकुमार राव त्यांची भूमिका साकारणार आहेत. मात्र, त्यानंतर तारखांच्या अडचणींमुळे काही अटकळीही बांधल्या गेल्या होत्या. आता राजकुमार राव यांनी चित्रपटाची पुष्टी करत आपली भूमिका निश्चित केली आहे. या बायोपिकमध्ये सौरव गांगुली यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते त्यांच्या कारकिर्दीपर्यंतच्या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. राजकुमार राव यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘मालिक’मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट 11 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव यांच्यासोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजकुमार रावने याआधी ‘श्रीकांत’,’शाहिद’, ‘अलीगढ’,’ओमेर्ता और चिट्टगोंग’,’बोस’ या सारखे बायोपिक देखील केले आहे. आता गांगुलीच्या क्रिकेट करिअरमधील अनेक ऐतिहासिक क्षण पडद्यावर पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. Rajkummar Rao | हेही वाचा: अॅक्सिओम-४ मिशन ! अवकाशात उड्डाण करण्यापूर्वी शुभांशू शुक्लाचा समोर आला पहिला फोटो