\n

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये, सोनम वांगचुक यांनी सरकारसोबत तडजोड केल्याच्या दाव्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये सोनम वांगचूक यांनी म्हंटले की, “विद्यार्थ्यांसाठी २६ दिवस उपोषण केल्यानंतर, ११ किलो वजन कमी झाल्यावर आणि लडाखच्या प्रचंड थंडीतून थेट दिल्लीच्या कडक उन्हात हे सर्व सहन केल्यानंतर, माझं उपोषण किती पवित्र होते, मी ते कोणाच्या हातून सोडलं किंवा मी काही तडजोड केली की नाही, याचे चारित्र्य प्रमाणपत्र मला कोणाकडून घेण्याची गरज आहे का?”

\n

‘अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणाऱ्या देशाला लाज वाटायला हवी’  (Sonam Wangchuk)

\n

सोनम वांगचुक पुढे म्हणाले, “मी जर माझे उपोषण सोडलं, तर तो कोणासोबत सोडलं? मी त्यांच्यासोबतच का सोडलं, मी ह्या व्यक्तीसोबत का नाही सोडलं? काय सौदा झाला होता? मला या सगळ्याची उत्तरे द्यावी लागतील. कालपासून मी फक्त द्रव पदार्थ खात आहे, ज्यामुळे मला थोडी ऊर्जा मिळाली आहे. सकाळपासून लोक मला फोन करत आहेत किंवा पोस्ट दाखवत आहेत, आणि म्हणत आहेत, तुमच्याबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडून उपवास का सोडला? तुम्ही दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडला?”

\n

जर मला सौदा करायचा असता, तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असते का? किती लोकांनी असे सौदे केले आहेत? ते असेच सौदे करतात का? आलिशान खोल्यांमध्ये बसून सौदे केले जातात. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणाऱ्या देशाला लाज वाटायला हवी, जिथून असे नीच विचार जन्माला येतात,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

\n

वांगचुक यांचे आवाहन   (Sonam Wangchuk)

\n

“मी कोणालाही दोष देत नाही, कारण तुमच्यापैकी बहुतेकांना मी कोणत्या परिस्थितीतून गेलो आहे याची कल्पना नाही. गेल्या १-२ आठवड्यांत माझं कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं आहे, हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे कोणाचेही ऐकण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी नक्की पाहा. त्यांच्या मनात काही आकस आहे का? ते अशा एखाद्या राजकीय पक्षाचे आहेत का ज्यांचे दुसऱ्या पक्षाशी वैमनस्य आहे, की ते एक निष्पक्ष व्यक्ती आहेत? जर ते निष्पक्ष असतील, तर नक्कीच त्यांचं ऐका” असं सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे.

\n

दरम्यान, नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी, सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी रात्री उशिरा भाजप नेते जेपी नड्डा यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतले.

\n

हेही वाचा: 

\n

Ahaan Panday: ‘सैयारा’नंतर अहान पांडेचा अॅक्शन अवतार; शर्वरीसोबत रोमान्स, ऐश्वर्य ठाकरे साकारणार खलनायक

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Sonam Wangchuk: “…अजूनही माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?”; ‘डिल’ केल्याच्या आरोपांवर सोनम वांगचूक यांचे सडेतोड उत्तर","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/Sonam-Wangchuk-3-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/Sonam-Wangchuk-3-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal#webpage","name":"Sonam Wangchuk: “…अजूनही माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?”; ‘डिल’ केल्याच्या आरोपांवर सोनम वांगचूक यांचे सडेतोड उत्तर","url":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal","inLanguage":"mr","description":"Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी भाजप नेते जेपी नड्डा यांच्या उपस्थित उपोषण मागे घेतले","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/Sonam-Wangchuk-3-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/is-there-still-a-need-to-prove-my-integrity-sonam-wangchuks-blunt-reply-to-allegations-of-striking-a-deal","name":"Sonam Wangchuk: “…अजूनही माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?”; ‘डिल’ केल्याच्या आरोपांवर सोनम वांगचूक यांचे सडेतोड उत्तर"}}]}}}

Sonam Wangchuk: “…अजूनही माझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची गरज आहे का?”; ‘डिल’ केल्याच्या आरोपांवर सोनम वांगचूक यांचे सडेतोड उत्तर